Badshah Music Video Controversy: बादशाहला 'सनक' पडलं महागात! अखेर तक्रार दाखल..

Badshah Music Video Controversy
Badshah Music Video ControversyEsakal

बादशाहने त्याच्या गाण्यांनी आणि रॅपने स्वत:साठी एक स्थान निर्माण केले आहे. त्यांची गाणी पार्टीत तरुणांना भुरळ घालतात. सध्या  रॅपर बादशाहच्या एका गाण्याला जोरदार विरोध होत आहे. बादशाहच्या नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या गाण्यात अत्यंत अश्लील शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्याला लोक विरोध करत आहेत. शिवभक्तांनी प्रसिद्ध रॅपरवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे. 

Badshah Music Video Controversy
Badshah Music Video Controversy: बादशाहच्या 'सनक' अल्बमवर महाकालचे पुजारी भडकले..FIR दाखल करण्याचा इशारा..

महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यासह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या नावाचा अश्लिल शब्द वापरल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यांनी गाण्यातून देवाचे नाव काढून माफी मागण्यास सांगितले आहे. माफी न मागितल्यास बादशाहविरोधात उज्जैनसह अन्य शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.

दरम्यान इंदूर येथाल 'परशुराम सेना' या संघटनेने गायक बादशाह यांच्यावर एका नवीन गाण्यात 'भोलेनाथ' हा शब्द वापरल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला करत त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

एमजी रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष सिंह यांनी सांगितले की, 'परशुराम सेना' या स्थानिक हिंदू संघटनेने बादशाहच्या गाण्याबाबत तक्रार दिली असून चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. या तक्रारीवर अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.

Badshah Music Video Controversy
Kangana Ranaut: बिडेन आणि दलाई लामा यांच्यावर पोस्ट करुन कंगना पस्तावली! बौद्ध लोकांनी केलं घराबाहेर निदर्शनं..

या संघटनेशी संबंधित वकील विनोद द्विवेदी यांनी आरोप केला आहे की, बादशाहच्या नव्या 'सनक' या गाण्याचे बोल अपशब्दांनी भरलेले आहेत आणि एका ठिकाणी 'भोलेनाथ' हा शब्द वापरण्यात आला आहे. बादशाहचे हे गाणे केवळ हिंदू समाजालाच नव्हे तर संपूर्ण सुसंस्कृत समाजाला आक्षेपार्ह असल्याचं त्यांनी सांगितले.

Badshah Music Video Controversy
Eid 2023: 'तू मुसलमान कधीपासून झाला..', ईदच्या दिवशीच प्रसिद्ध गायक शानवरनं सोशल मीडियावर राडा..जाणून घ्या प्रकरण

वास्तविक, नुकताच बादशाह 'सनक'चा अल्बम रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 15 सेकंदांचे हे अल्बम गाणे खूप ट्रेंड करत आहे. या गाण्यात शिवीगाळ, सेक्स असे अनेक शब्द वापरण्यात आले आहेत. या गाण्यात तो स्वत:ला भोलेनाथचा भक्त म्हणतं त्याची साथ त्याला आहे असं म्हणत आहे. अशा गाण्यांमध्ये भोलेनाथांचा वापर करून स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतल्याने भक्त संतापले आहेत. या गाण्याला आतापर्यंत 18 लाख लोकांनी पाहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com