Movie On Russia-Ukraine war: 'ऑपरेशन गंगा' वर येतोय सिनेमा, पोस्टरवर दिसली नरेंद्र मोदींची झलक.. Operation amg movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Operation amg movie announced based on evacuation mission during russia ukraine war

Movie On Russia-Ukraine war: 'ऑपरेशन गंगा' वर येतोय सिनेमा, पोस्टरवर दिसली नरेंद्र मोदींची झलक..

Movie On Russia-Ukraine war: रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान भारत सरकारने युक्रेनमध्ये फसलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना देशात सुरक्षित परत आणण्यासाठी 'ऑपरेशनं गंगा' प्लॅन केलं होतं. आता यावर सिनेमा येतोय. या सिनेमाचं नाव आहे 'ऑपरेशन AMG' आणि पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. (Operation amg movie announced based on evacuation mission during russia ukraine war)

ऑपरेशन AMG चे दिग्दर्शन ध्रुव लाथर करणार आहे. सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. पोस्टरमध्ये विमान,युद्धजन्य परिस्थिती दाखवणारा फोटो आणि हल्ल्यात उद्धव्स्त झालेलं युक्रेन दिसत आहे.

याव्यतिरिक्त आणखी एक फोटो समोर आला आहे,ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठमोरे दिसत आहेत. त्यांचा चेहरा पोस्टरवर दिसत नाही. पोस्टरमध्ये लिहिलं आहे की,,'भारत तुम्हाला मायदेशी नेण्यासाठी येत आहे'.

सिनेमाचं पोस्टर रिलीज करताना निर्माता नीतू जोशीनं लिहिलं आहे की,'आपला सीट बेल्ट बांधा आणि रशिया युक्रेन युद्धा दरम्यान झालेल्या सत्य घटनांचे साक्षीदार बनण्यासाठी सज्ज व्हा. या सिनेमाची निर्मिती एबिना एंटरटेन्मेंट बॅनर अंतर्गत केली जात आहे'.

हेही वाचा: T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

मेकर्सनुसार युक्रेनमध्ये फसलेल्या जवळपास १६ हजार भारतीय जीवांना वाचविण्यासाठी भारत सरकारने त्यांना मायदेशी आणण्यासाठी एक ऑपरेशन प्लॅन केलं होतं. यावर आता सिनेमा बनवला जात आहे.

सिनेमाला सुनिल जोशी आणि नीतू जोशी,सतीश शेट्टी यांनी प्रोड्युस केलं आहे. सिनेमाची कथा आणि पटकथा समीर अरोरा आणि प्रेरणा अरोरा यांनी लिहिली आहे. संवाद संजीव रणवीर पुरीचे आहेत तर सिनेमॅटोग्राफी रवी यादव यांची असणार आहे. २६ जानेवारी २०२४ रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज केला जाणार आहे.