esakal | "किसिंग सीनला तुझा नकार का?"; ऐश्वर्याला विचारलेल्या प्रश्नावर अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

aishwarya abhishek

ऐश्वर्या काही बोलण्याआधीच अभिषेकने दिलं उत्तर

"किसिंग सीनला तुझा नकार का?"; ऐश्वर्याला विचारलेल्या प्रश्नावर अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रसिद्ध अमेरिकन सूत्रसंचालक ओप्रा विन्फ्रेनं नुकतीच 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची मुलाखत घेतली. ही मुलाखत सर्वत्र चांगलीच चर्चेत होती. याआधीही ओप्राने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत. २००९ मध्ये तिने ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या जोडीची मुलाखत घेतली होती. २००७ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि त्यावेळी ही जोडी खूप चर्चेत होती. लग्नापूर्वीही अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र चित्रपटांत काम केलं होतं. यावेळी मुलाखतीत ओप्राने ऐश्वर्याला 'नो किसिंग रुल'वरून प्रश्न विचारला. इतकं यशस्वी करिअर असताना, हॉलिवूडमध्येही ओळख प्रस्थापित केली असतानाही पडद्यावर 'नो किसिंग'चा नियम का, असा प्रश्न ओप्राने तिला विचारला होता. यावर ऐश्वर्या काही बोलण्याआधीच अभिषेकने तिला उत्तर दिलं. 

ओप्राचा प्रश्न ऐकून ऐश्वर्या सुरुवातीला हसली आणि तितक्यात अभिषेकने तिला गालावर किस केलं. हे पाहून उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. अभिषेक पुढे म्हणाला, "भारतात कॅमेरासमोर उघडपणे बऱ्याच गोष्टी दाखवल्या जात नाही, जितक्या पाश्चिमात्य देशांमध्ये दाखवल्या जातात. त्या गोष्टींना  लोक स्वीकारतीला का असा प्रश्न नाहीये, तर त्या गोष्टींची गरजच आम्हाला नाही. अनेक भारतीय प्रेक्षकांना असं वाटतं की ती गोष्ट पडद्यावर दाखवणं गरजेचं नाही. जर एखाद्या दृश्यात मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले असतील आणि त्यांना ते प्रेम व्यक्त करायचं असेल किंवा किस करायचं असेल तर भारतात आम्ही तिथे गाण्याचा प्रभावी वापर करतो."

हेही वाचा : बॉबी, ऐश्वर्याला कित्येक वर्षांपूर्वी होती कोरोनाची माहिती; भन्नाट मीम्स व्हायरल

अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज कसं केलं, असा प्रश्नही तिने या मुलाखतीत विचारला. "मी न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. माझ्या हॉटेल रुममधील बाल्कनी मला खूपच आवडली होती आणि ती तिथे असती तर तिला लग्नासाठी नक्कीच विचारलं असतं असा प्रश्न मनात आला. नंतर मी तिला त्याच हॉटेल रुममधील बाल्कनीमध्ये नेलं आणि लग्नासाठी प्रपोज केलं", असं अभिषेकने सांगितलं. अभिषेक- ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे.
 

loading image