esakal | 'गाण्याची वाट लावली'; 'चुरा के दिल मेरा'चं रिमेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

 Chura Ke Dil Mera song

'गाण्याची वाट लावली'; 'चुरा के दिल मेरा'चं रिमेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

'मै खिलाडी तू अनाडी' (main khiladi tu anari) या चित्रपटातील 'चुरा के दिल मेरा' (Chura Ke Dil Mera) हे गाणं तुफान गाजलं होतं. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. 'चुराके दिल मेरा' गाण्यातील बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (akshay kumar) आणि ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. नुकताच हंगामा-2 (Hungama 2) या चित्रपटामध्ये 'चुरा के दिल मेरा' गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे. 'चुरा के दिल मेरा: 2.0' (Chura Ke Dil Mera 2.0) गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून शिल्पाने त्याला कॅप्शन दिले, 'हे गाणं म्हणजे नव्या बॉटलमध्ये जुनी वाईन.अक्षय कुमारची आठवण येत आहे. मात्र हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं दिसत नाहीये. या रिमेकला अनेकांनी ट्रोल केलं असून गाण्यावर टीका केली आहे. जुनं तेच सोनं होतं, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. (Hungama 2 song Chura Ke Dil Mera remake song Shilpa Shetty and singer get trolled)

'चुरा के दिल मेरा: 2.0' हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काही नेटकऱ्यांनी 'जुनं ते सोनं' अशी कमेंट करून या गाण्याच्या जुन्या व्हर्जनला पसंती दिली आहे. तर एका यूजरने कमेंट केली, 'माफ करा पण बकवास गाणं आहे' तर एकाने लिहीले की, 'जुन्या गाण्यासारखा ना आवाज आहे ना संगीत'

हेही वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिनेत्रीने सोडली 'देवमाणूस' मालिका?

हेही वाचा: "रणवीरला विरोध करून मीच मूर्ख ठरलो"; करण जोहरला झाली उपरती

एनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पाने या गाण्याबद्दल सांगितले, 'चुरा के दिल मेरा हे गाणं माझ्या करियरमधील सर्वांत महत्वाचे गाणे आहे. हे गाणं माझ्यासाठी नेहमीच खूप विशेष राहिलं. आता या गाण्याच्या रिमेकबद्दल मला खूप उत्सुकता आहे. जुन्या गाण्याला 25 वर्षे झाले तरी प्रेक्षकांचे प्रेम अजूनही त्याला मिळत आहे. माझी आशा आहे की नवे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल.'

हेही वाचा: अखेर राहुल-दिशाच्या लग्नाची तारीख जाहीर

loading image