Oscar 2024 Updates : 'ऑस्कर' सोहळा बंद पाडण्यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक? काय आहे कारण?

ऑस्कर सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लॉस एंजेलिस पोलिसांनी काळजी घेतली आहे.
Oscar 2024 Updates
Oscar 2024 Updatesesakal

Oscar Awards 2024 : इस्राईल आणि हमास यांच्या युद्धाचे पडसाद वेगवेगळ्या गोष्टींवर उमटले असून त्याचा परिणाम आता चर्चेतील ऑस्कर सोहळ्यावरही होणार असल्याचे बोलले जात आहे. ९६ व्या अकादमी सोहळ्यात कोणताही गदारोळ होणार नाही यासाठी लॉस एंजेलिस विभागाचे पोलीस लक्ष ठेवून आहे.

पोलिसांनी आता ज्या ठिकाणी ऑस्कर सोहळा पार पडणार आहे तिथे बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेचा कोणताही प्रश्न तयार होऊ नये म्हणून पोलिसांना सुचना देण्यात आला आहे. आंदोलन कर्त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी हा पुरस्कार सोहळा बंद कसा करता येईल यासाठी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

Oscar 2024 Updates
Oscar 2024 Updates : तब्बल १३ नामांकन असणारा 'ओपनहायमर' की 'पुअर थिंग्ज', कोण मारणार बाजी? 'ऑस्कर'ची उत्सुकता शिगेला!

डेडलाईन डॉट कॉम आणि इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे पुरस्कार वितरण केले जाऊ नये अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे. पॅलेस्टानी समर्थक यांनी अॅक्शन ऑन ऑस्कर संडे घोषित केला आहे. फिल्म वर्कर्स फॉर पॅलेस्टाईन आणि एसएजी एफटीआरएफ फॉर सीझफायर यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला या आंदोनलाविषयी भूमिका घेतली होती.

सध्या गाझा पट्टीमध्ये जे काही सुरु आहे त्याचा कुणालाही विसर पडता कामा नये. आम्ही त्याबाबत अतिशय वेगळी भूमिका मांडतो आहोत. पॅलेस्टाईनच्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे दुर्लक्षित करता कामा नये. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांना ऑस्कर सोहळ्याविषयी कोणतीही माहिती मिळु नये याचीही काळजी घेतली जात आहे.

Oscar 2024 Updates
Oscar 2024 Latest Updates : 'ऑस्कर'च्या ट्रॉफीची 'ती' खास गोष्ट माहितीये? ज्याच्या हाती येते ती बाहुली त्याला तब्बल....!

ऑस्कर सोहळ्या दरम्यान रस्त्यावर कुणी येणार नाही, वातावरण बिघडणार नाही याची काळजीही घेतली जाणार आहे. याबाबत लॉस एंजेलिस पोलिस विभागाचे कमांडर रॅडी गोदार्द यांनी स्पष्ट शब्दांत आंदोलन कर्त्यांना ताकीद दिली आहे. ऑस्कर सोहळ्यात कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार याची काळजी घेतली जाणार आहे.

आयएनएसच्या रिपोर्टनुसार, गोदार्द यांनी म्हटलं आहे की, आंदोलनकर्त्यांच्या आक्रमकपणामुळे जिथे अॅकडमी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तेथील सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. ऑस्करच्या सोहळ्याला येणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रेटींची उपस्थिती लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. असेही सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com