अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या थिएटरमध्ये 'RRR' चे स्क्रिनिंग, अख्खं हाऊसफुल्ल! | Oscar Awards 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Oscar

Oscar Awards 2023 : अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या थिएटरमध्ये 'RRR' चे स्क्रिनिंग, अख्खं हाऊसफुल्ल!

Oscar Awards 2023 : टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआऱ या चित्रपटानं जगभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील नाटू नाटू गाणं ऑस्करच्या प्रतिक्षेत आहे. यासगळ्यात आरआरआरच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला आहे.

आरआरआर हा खऱ्या अर्थानं ग्लोबल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये या चित्रपटानं भारताचे नाव आणखी उज्ज्वल केले आहे.यासगळ्यात आरआऱआर चित्रपटाचे अमेरिकेतील एका थिएटरमध्ये स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. यावेळी तब्बल दोन हजार आसनांचे हे थिएटर हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

विदेशी प्रेक्षकांना आणि समीक्षकांना आरआरआऱनं वेड लावलं आहे. त्यातील अॅक्शन, नाटू नाटू गाणं, त्याचे बोल, संगीत यानं अनेकांना भुरळ पाडली आहे. काही झालं तरी आपण ऑस्करवर मोहोर उमटवणार याचा दावा आरआऱआरच्या निर्मात्यांनी केला आहे. आता तर ऑस्करवर आरआरआऱचा प्रबळ दावा जाहीर झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचे दुसरे कारण म्हणजे ऑस्करच्या सोहळ्यात नाटू नाटूचे होणारे सादरीकरण.

ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल साँग कॅटगिरीमध्ये आरआरआऱच्या नाटू नाटू ला नॉमिनेशन मिळाले आहे. त्या गाण्यामध्ये ज्युनियर एनटीआर, आणि रामचरण या यांनी ज्या वेगानं आणि कौशल्यानं डान्स केला आहे त्याला तोड नाही. त्यांच्या डान्सची सगळीकडे चर्चा आहे. संगीतानं चाहते बेभान झाले आहे. ऑस्करच्या परिक्षकांना देखील नाटू नाटूनं वेड लावलं आहे.

९५ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटूला मिळालेलं नॉमिनेशन हे समस्त भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. दरम्यान लॉस एंजेलिसमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या थिएटरमध्ये आरआऱआऱचे स्क्रिनिंग पार पडणार आहे. त्याला चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली, रामचरण, एमएम किरावानी उपस्थित होणार आहे.