RRR: ऑस्कर विनर Resul Pookutty म्हणतो RRR ला 'गे लव स्टोरी' ! नंतर दिले स्पष्टीकरण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR movie called to be gay love story by oscar winner resul pookutty

ऑस्कर विनर Resul Pookutty म्हणतो RRR ला 'गे लव स्टोरी' ! नंतर दिले स्पष्टीकरण..

'एस एस राजामौली' या चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर बहुचर्चित होती.आणि या चित्रपटाचं सगळ्या स्तरावर जेथे कौतुक केल्या गेलं तेथे रेसुल पोकुटीने या चित्रपटाचा ट्विट करत विनोद केलाय.'एस एस राजामौली' या ब्लॉकबास्टर चित्रपटाबद्दल ऑस्कर विनर रेसुल पोकुटी यांनी केलेल्या वक्तव्यावर सध्या नेटकऱ्यांचा हल्लाबोल झालाय.RRR ला 'गे लव स्टोरी' म्हटल्यानंतर त्यांनी त्याबातचं स्पष्टीकरणही दिलं आहे.रेसुल पोकुटी यांनी नेमकं असं काय म्हटलं ज्यावर बाहुबली निर्माते शोबु यर्लागड्डा यांनी संताप व्यक्त केलाय.

२०२२ चा एस एस हा ब्लॉकबास्टर चित्रपट आहे.प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरपूर प्रेम मिळालं.पण मात्र ऑस्कर विनर साऊंड डिझायनर रेसुल पोकुटीला या चित्रपट आवडला नाही.त्याने आलियाच्या भूमिकेवरही यावेळी विनोद केलाय. त्याने ट्विटरवर या चित्रपटाबाबत जे वक्तव्य केलंय त्यावर अनेकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.'गे लव स्टोरी' असे म्हणताच रेसुलवर चाहते भडकले.सोशल मीडियावर रेसुलला लोकांनी ट्रोल केलं आहे.रेसुलच्या या ट्विटवर बाहुबली दिग्दर्शकांनी नाराजी व्यक्त केलीय.

यानंतर एका युजरने पब्लिक रिपोर्टचा संदर्भ देत रेसुलला प्रश्न केला की, 'तुम्हाला नेमकं या आर्टिकलबद्दल बोलायचं होतं काय?' यावर रेसुलने स्पष्टिकरण दिलंय की,मी फक्त तेच शब्द कोट केलेय जे आधीच पब्लिक डोमेनला होते.बाहुबली निर्मात्याच्या ट्विटवर देखील रेसुलने उत्तर दिलंय."तुमची नाराजी मला मान्य आहे.हा चित्रपट एक प्रेम कथा असेल तरी त्यात काही चूकीचं नाही पण मी माझ्या ट्विटरवर माझ्या मित्राला कोट केलं होतं आणि तो एक विनोद होता.मला कोणाचा अपमान करायचा नव्हता."

Web Title: Oscar Winner Resul Pookutty Tweet Ss Rajamouli Is Gay Love Story Make Fun Of Alia Bhatt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..