...तर मी पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार; कंगणाने पुन्हा ठणकावले

संतोष भिंगार्डे
Saturday, 18 July 2020

आताही तिने पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला आहे. आपण हे आरोप सिद्ध करण्यासाठी मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही ती म्हणाली.

मुंबई : आपल्या रोखठोक भूमिकेमुळे नेहमी चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रानौतने आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी बॉलीवूडमधील नेपोटिझम जबाबदार असल्याचे विधान तिने केल्याने मोठी खळबळ उडाली होती.  आता यावेळी तर तिने चक्क पद्मश्री पुरस्कार परत करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

तब्बल चार दिवसांनी मिळाला बेड; वाचा कोणाबाबत घडला हा प्रकार...​

हिंदी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला चित्रपटांमध्ये संधी देण्यासाठी इतरांवर अन्याय केला जातो. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या टॅलेंटला दुर्लक्षित केले जाते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येलाही येथील नेपोटिझम कारणीभूत आहे. माझ्या या आरोपामध्ये तथ्य नसेल तर आपण पद्मश्री हा किताब परत देऊ शकतो, असे अभिनेत्री कंगना रानौतने ठणकावून सांगितले आहे.

'दिल बेचारा'साठी अभिनेत्री संजना सांघीने शिकली बंगाली भाषा...

अभिनेत्री कंगना रानौतला हिंदी चित्रपटसृष्टीत भक्कमपणे पाय रोवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला आहे. अभिनेता सुशांत सिंहने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील  नेपोटिझमचा मुद्दा उपस्थित केला होता. सुशांतच्या आत्महत्येला हिंदीतील नेपोटिझम जबाबदार आहे आणि वेळ आल्यास आपण हे सिद्ध करू शकतो, असेही ती म्हणाली. 

मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी एकता कपूरने स्थापन केले 'मेन्टल हेल्थ अवरनेस फंड'...

आताही तिने पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला आहे. आपण हे आरोप सिद्ध करण्यासाठी मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही ती म्हणाली. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप तिला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलेले नाही. सध्या कंगना मनाली येथे आपल्या घरी आहे. 
---
(संपादन : ऋषिराज तायडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: otherwise I am ready to return my padmashri award to govt, say actress kangana ranaut