'पद्मावत'वरुन स्वरा भास्करचे भन्साळींना खुले पत्र

सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई - 'पद्मावत' प्रदर्शित होऊन काही दिवस झाले आहेत, मात्र चित्रपटावरुन वाद सुरुच आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने आता भन्साळी यांना एक खूले पत्र लिहिले असून, हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात तिने संजय लीला भन्साळी यांच्यावर सती आणि जोहर या अनिष्ट प्रथांचे उदात्तीकरण केले असल्याची टीका केली आहे. 

मुंबई - 'पद्मावत' प्रदर्शित होऊन काही दिवस झाले आहेत, मात्र चित्रपटावरुन वाद सुरुच आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने आता भन्साळी यांना एक खूले पत्र लिहिले असून, हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात तिने संजय लीला भन्साळी यांच्यावर सती आणि जोहर या अनिष्ट प्रथांचे उदात्तीकरण केले असल्याची टीका केली आहे. 

'पद्मावत'ला करणी सेनेकडून विरोध होत असताना स्वरा मात्र ठामपणे चित्रपटाच्या बाजूने उभी होती. परंतु, चित्रपटात बघितल्यानंतर त्यात जोहर प्रथेचे उदात्तीकरण करण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. बलात्कार झाला तरी महिलांना जगण्याचा अधिकार आहे. पती जिवंत नसला तरी महिलेचा जगण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही, असा ठणकावून सांगण्याचा आजचा जमाना आहे. परंतु, पद्मावत चित्रपटाचा शेवट पाहून स्त्री सक्षमीकरणासाठी आजवर झालेल्या चळवळी व्यर्थ ठरल्याची भावना झाल्याचे मत स्वराने नेंदविले आहे. तसेच, महिलांचा मतदानाचा, मालमत्तेचा, शिक्षणाचा, समान वेतनाचा अधिकार हे सगळे निरर्थक वाटू लागल्यागचेही तिने पत्रात म्हटले आहे. 

भन्साळीं पुन्हा एकदा स्त्रियांना भूतकाळात घेऊन गेले. स्त्रियांना, विधवांना, बलात्कार पीडितांना या समाजात पुरुषांच्या संमतीशिवाय मानाने जगण्याचा खरेच अधिकार आहे का? अशी शंका चित्रपट पाहून मनात आल्याचे स्वराने या पत्रात म्हटले. 

'दी इंडियन सती प्रिव्हेन्शन अॅक्ट 1988' संमत झालेला असताना अशा प्रकारे सती प्रथेचे उदात्तीकरण करणे हा गुन्हा आहे. तिकीट काढून तुमचा चित्रपट बघणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी तुम्ही बांधिल आहात,' असेही स्वराने भन्साळींना सुनाविले आहे.

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्तीने मात्र स्वराच्या पत्राशी सहमत नसल्याचे सांगत ट्विट केले आहे. लहानपणापासून मी पद्मावतीची गोष्ट ऐकली आहे. आपल्यासारख्या अनेकांनी ती ऐकली असेल, आता आजच्या काळाच्या स्त्रीवादी मतांसाठी सहमत होण्यासाठी पद्मावतीच्या गोष्टीचा शेवट कसा बदलणार. हे करणी सेनेच्या विरोधापेक्षाही वाईट असल्याचे तिने म्हटले आहे. 

 

Web Title: Padmaavat: Suchitra Krishnamoorthi trolls Swara Bhasker's open letter but Swara hits back