Pagalpanti Movie Poster : 'पागलपंती' चा पोस्टर रिलिज,पहिल्यांदाच एकत्र दिसणार 'ही' जोडी

pagalpanti movie posters are out
pagalpanti movie posters are out

मुंबई : बॉलिवूडचा फिटेस्ट हिरो जॉन अब्राहम आणि इलियाना डिक्रुझ ही जोडी यापूर्वी कधीच एकत्र दिसली नव्हती आता मात्र एका दमदार कास्टसह हे दोघं नव्या चित्रटातून झळकणार आहेत. 'पागलपंती' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी कधीच एकत्र न दिसलेले कलाकार यामध्ये एकत्र दिसणार आहेत. चित्रपटातील कलाकारांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर अपलोड करुन रिलिज केले आहेत. 

या चित्रपटातून जॉन अब्राहमसह अभिनेत्री इलियाना डिक्रुज, अनिल कपूर, सौरभ शुक्ला,क्रिती खारबंदा, पुलकित सम्राट आणि अर्शद वारसी हि मंडळीदेखील झळकणार आहेत. पोस्टर रिलिज झाल्यानंतर काही वेळातच हे पोस्टर इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. पोस्टरच्या लुकनंतर लक्षात येते की, चित्रपट हा कॉमेडी आणि मजेशीर असणार आहे. 
चित्रपटाचं दिग्दर्शन अनिज बाझमी यांनी केलं असून 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

जॉन यामध्ये राज किशोर ही भूमिका साकारणार असून इलियाना 'संजना' नावाच्या रोलमध्ये दिसणार आहे. अनिल कपूर हे 'वायफाय भाई' या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरच्या लुक पाहिल्यावर लक्षात येते की चित्रपट कॉमेडीची मेजवानी असणार आहे. अशाप्रकारची दमदार कास्ट पाहिल्यावर प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. पहिल्यांदाच जॉन आणि इलियाना मोठ्या पडद्यावर एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत. 

या चित्रपटासह आणखी एका गोष्टीची चर्चा सध्या बी- टाउनमध्ये सुरु आहे ती म्हणजे अभिनेत्री क्रिती खारबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या अफेअरची. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानच्या अफेअरची अफवा सुरु होतीच. मात्र त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दोघांनी दिलेली नाही. 

इलियाना 'रेड' या चित्रपटातून 2018 मध्ये अजय देवगणसह दिसली होती. तर, जॉनचा 'बाटला हाउस' काही दिवंसापूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. क्रिती खारबंदा हि अभिनेत्री 'शादी मे जरुर आना' या चित्रपटातून झळकली होती. तिचा 'हाउसफुल 4' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com