
Hania Amir: नाटू-नाटू' वर पाकिस्तानच्या अभिनेत्रीचं नाचो नाचो! जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल
RRR या लोकप्रिय चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या जोडिनं तर कमालचं केली आहे. या दोघांनी नाटू-नाटू जोरदार डान्स केला. या गाण्याला केवळ ऑस्कर नामांकनातच नाही तर गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्डही मिळाला आहे.
आता या गाण्याने पुर्ण देशालाच नव्हे तर जगालाही भुरळ पाडली आहे. या गाण्याने पाकिस्तानातही धुमाकूळ घातला आहे. नुकताच पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.ज्यामध्ये तो 'नाटू-नाटू' या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स देताना दिसत आहे. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिर तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्न समारंभाचा आहे, जिथे अभिनेत्री हानिया आमिरने RRR मधील 'नाटू-नाटू' ' गाण्यावर एका मुलासोबत डान्स केला.
हा व्हिडिओ अभिनेत्री सबूर अली आणि हानियासह अनेक पाकिस्तानी स्टार्सनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हानियाने पांढर्या स्नीकर्ससह शरारा परिधान केला आहे. . तिने लग्नात पाहुण्यांसमोर डान्स करून सर्वांची मनं जिंकली.सोशल मीडियावर अनेक लोक हानियाच्या डान्स परफॉर्मन्सचे कौतुक करत आहेत.
हानियाचा चाहतावर्ग भारतही आहे. तिचा 'हमसफर' हा ड्रामा भारतातही खुप गाजला. तिला भारतिय चित्रपटांबद्दलही बरचं आकर्षण आहे. ती तिच्या इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करते. यातील बहुतांश भारतीय चित्रपटांशी संबंधित आहेत.