'हिच भावं खाऊन जाणार' , मराठी अभिनेत्रीच्या अभिनयानं घाबरल्या होत्या श्रीदेवी घाबरल्या! तिचे सीन्सच काढून टाकले...

Sridevi Death Anniversary
Sridevi Death AnniversaryEsakal

Sridevi Death Anniversary: ​​बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. 2018 मध्ये याच दिवशी श्रीदेवी आपल्याला सोडून गेल्या. मात्र, आज जरी श्रीदेवी आपल्यात नसली तरी तिचे अनेक चित्रपट आणि सदाबहार गीते याच्यातुन त्या आपल्यासोबत असतात. श्रीदेवी यांच्याशी संबंधित अनेक किस्से आजही आहेत.

तिची दिलखेच अदा आणि अभिनयाने सर्वांना खुप मोहित केले आहे. तिची जागा कोणीच घेवू शकत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे की श्रीदेवी ही एका अभिनेत्रीचा अभिनय पाहिल्यानंतर हेवा वाटला आणि माझ्या चित्रपटात हिच अभिनेत्री भाव खाऊन जाणार असं तिला वाटलं. ही गोष्ट आहे1993 मध्ये आलेल्या 'गुमराह' चित्रपटाची. ज्यामध्ये श्रीदेवी मुख्य भूमिकेत होती, तर प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू श्रीदेवीच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

श्रीदेवी त्या काळात खुप मोठी अभिनेत्री होती. तिची क्रेझ तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात होती. ती तिच्या काळातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी त्यावेळी एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये घेत होती. मात्र त्याचवेळी रीमा लागू यांचे नावही त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे चर्चेत होतं. रीमा लागू ह्या अभिनेत्रीच्या आईच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होत्या. त्या पात्राच्या भूमिकेत रीमा यांचा अभिनय इतका जबरदस्त होता की अनेकवेळा मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री यांचा अभिनयही फिका पडत असे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रीमाने जवळपास 25 चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली होती. यापैकी ती सात वेळा सलमान खानच्या आईच्या भूमिकेत दिसल्या आहे. रीमा आईच्या भूमिकेत इतक्या तल्लीन झाली होती की, तिचा अभिनय पाहून श्रीदेवी घाबरून गेली होती. रीमाचा अभिनय इतका दमदार होता की श्रीदेवीचा अभिनय तिच्यासमोर कुठेतरी फिका पडत होता. मग काय, श्रीदेवीने लगेचच चित्रपटाच्या निर्मात्यांना रीमाच्या सीन्सवर कात्री लावायला सांगितली आणि तसंच काहीसं झालं. त्यामुळेच श्रीदेवीच्या सांगण्यावरून 'गुमराह' चित्रपटातून रीमाचे अनेक सीन्स कापण्यात आले होते. .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com