कोण आहे ही आंटी? पाकिस्तानी अभिनेत्रीनं करिना कपूरला छेडलं|Pakistani Actress Hira mani comment Kareena Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistani Actress Hira mani comment Kareena Kapoor

कोण आहे ही आंटी? पाकिस्तानी अभिनेत्रीनं करिना कपूरला छेडलं

Bollywood News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) खरं तर तिच्या झिरो फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. चाहत्यांच्या कौतुकाचा विषयही असते. आता ती (Zero Figure) ट्रोल झाली आहे. तिच्यावप पाकिस्तानी अभिनेत्री हिरा मानीनं टीका केली आहे. तिला आंटी म्हणून ट्रोलही केलं आहे. त्या अभिनेत्रीच्या व्हाय़रल झालेल्या एका व्हिडिओमध्ये (Viral Video) तिनं करिनाच्या दिसण्यावरुन तिच्यावर टीका केली आहे. अर्थात करिनाच्या चाहत्यांना ती कमेंट काही आवडलेली नाही. त्यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीवर जोरदार प्रत्युत्तर केलं आहे. काहींनी खालच्या भाषेचा वापर करुन आपला राग व्यक्त केला आहे. करिना कपूरला बॉडी शेमिंग प्रतिक्रिया देऊन त्या अभिनेत्रीनं प्रसिद्ध होण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पाकिस्तानी हिरा मानी तेवढ्यावरच थांबलेली नाही. तिनं त्या व्हिडिओमधून करिनाच्या वजनाची खिल्ली उडवली आहे.

नवऱ्याचं काम फक्त टोमणे मारणं एवढचं असतं. मात्र ते त्यांनी वेळेवर केलं नाही तर पत्नीचं वजन वाढू लागतं. अशा शब्दांत त्या अभिनेत्रीनं करिनाची टिंगल केली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हिरा मानी आणि तिच्या पतीनं एका चॅनेलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिचे पती तिला बॉलीवूडच्या अभिनेत्रीवरुन टोमणे मारत होते. त्यावेळी हिरानं सांगितलं की, यावेळी मी जेव्हा वजन कमी केलं तेव्हा माझ्याकडे काहीही ऑप्शन नव्हता. कुठल्याही साधनाविना मी माझे वजन कमी केले. माझं वजन 64 किलो झालं होतं. मात्र मोठ्या कष्टपूर्वक मी ते कमी केल्याचे हिरानं सांगितलं आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

त्या अभिनेत्रीच्या कमेंटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, तू जे काही बोलली आहेस त्याला आम्ही फारसं महत्व देत नाही. आम्हाला हे सगळं एखाद्या विनोदासारखं वाटतं. दरवेळी काहीही कमेंट करुन चर्चेत राहायचं हे तुम्हाला जमलं आहे.त्यामुळे तू जे म्हणते आहे ते त्याला कसलाही आधार नाही. बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर टीका करुन प्रसिद्ध व्हायचं असाच तुझा हेतू असल्याची टीका आता नेटकऱ्यांनी त्या पाकिस्तानी अभिनेत्रीवर करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: Viral Video:आलिशान कारमधे फिरणारी नोरा नटून थटून स्कूटरवर का गेली?

Web Title: Pakistani Actress Hira Mani Comment Kareena Kapoor Khan Body Shaming Comment Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top