Mahira Khan: मला शाहरुखसोबत...पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा भलतंच बोलून गेली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahira Khan

Mahira Khan: मला शाहरुखसोबत...पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा भलतंच बोलून गेली..

बॉलिवूडमध्ये भारतीयचं नाही तर इतर देशातील कलाकारांनाही संधी दिली. त्यांनीही चित्रपटात आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळ स्थान निर्माण केलंयं. यातच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या नावाचाही सामावेश होतो. तिचे चाहते भारतातही कमी नाहीत. सीमेपलीकडूनही तिचा आभिनयला इथेही लोक पसंत करतात. (pakistani actress Mahira Khan on shah rukh khan)

माहिराने बॉलिवूडमध्ये काम केले आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत ती पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये दिसली. त्याच्या जोडिची चर्चाही रंगली होती. अशातच जेव्हा माहिराला एका चाहत्याने शाहरुख खानबद्दल विचारलं तेव्हा तिला उत्तर देणं हे बंधनकारक होते.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

माहिरा खानने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यासाठी त्यांनी ट्विटरवर आस्क माहिरा हा हॅशटॅग सुरू केला. या हॅशटॅगसह हजारो चाहत्यांनी माहिराला अनेक प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न शाहरुख खानबद्दल होता. त्यावर माहिराने असं उत्तर दिलं की यामूळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

हेही वाचा: Bigg Boss 16: अख्या घराला बोटावर नाचवणारा शिव आज ढसाढसा रडला! अर्चनाचेही अश्रू अनावर.. कारण ऐकून..

रईस चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चाहत्याने विचारले, की, शाहरुख खानसोबत तुम्हाला कोणता सीन पुन्हा पुन्हा करायला आवडेल? यावर माहिराने एक खास फोटो शेअर करत हा सीन सांगितला. फोटोमध्ये शाहरुख खान आणि माहिरा खान रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. माहिरा खानचे हे ट्विट चाहत्यांना खूप आवडले. आत्तापर्यंत यावर १३०० हून अधिक रिट्विट झाले आहेत. तिला किंग खानसोबत पुन्हा रोमँटिक सीन करायचा आहे, हे तिच्या या उत्तरावरून स्पष्ट होते. रईस या चित्रपटातून माहिरा खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

माहिरा खानने २०१७ मध्ये रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीही दिसला होता. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, गौरी खान आणि फरहान अख्तर यांनी केली होती. जवळपास 90 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 300 कोटींचा व्यवसाय केला. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. चित्रपटातील गाणीही बरिच हिट झाली होती.

हेही वाचा: Shah Rukh Khan: 'उमराह' करण्यासाठी शाहरूख खानची मक्का मदिनाला भेट