esakal | आई- सावत्र वडिलांची भांडणं, पलकचा मोठा निर्णय?
sakal

बोलून बातमी शोधा

shweta tiwari, palak tiwari

आई- सावत्र वडिलांची भांडणं, पलकचा मोठा निर्णय?

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी(shweta tiwari) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्वेताचा अभिनव कोहलीसोबत घटस्फोट झाला. त्यांना रेयांश नावाचा 4 वर्षांचा मुलगा आहे. श्वेता सध्या ‘खतरों के खिलाडी’या शो च्या शूटिंगसाठी केपटाऊनला गेली आहे. श्वेताने या शो मध्ये सामील होण्यासाठी आपल्या मुलाला हॉटेलमध्ये सोडले. त्याची माहिती श्वेताने अभिनवला दिली नाही असा आरोप अभिनवने श्वेतावर केला. त्याचवेळी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना श्वेताने स्पष्टपणे सांगितले होते की, शो मध्ये सामील होण्यापूर्वी तिने अभिनवला कळवले होते. याविषयांवरून दोघांमध्ये सध्या प्रचंड वाद होत आहे. या वादाला कंटाळून आता श्वेताची मुलगी पलकने (palak tiwari) एक मोठा निर्णय घेतला आहे.(palak tiwari deleted instagram account because of mother shweta tiwari abhinav kohli fight)

पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. पलकने तिचे सोशल मीडिया अकाऊंट बंद केले आहे. याचे कारण श्वेता आणि अभिनव यांच्यामधील भांडण आहे असे म्हटले जात आहे. पलक लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली होती. पण आता सावत्र वडिल आणि आईमधील भांडणामुळे तिने सोशल मीडिया वापरणे बंद केले आहे अशी चर्चा आहे. पलकच्या सोशल मीडिया अकांऊटवरील सर्व फोटो डिलीट करण्यात आले आहेत.

हेही वाचा: मी वयाच्या ४५व्या वर्षीही करते घोडचुका- सुष्मिता सेन

1998 साली श्वेताने राजा चौधरीसोबत लग्न केले. त्यानंतर 2007 साली त्यांचा घटस्फोट झाला. 2010 पासून श्वेता अभिनवला डेट करत होती. 2013 मध्ये श्वेता आणि अभिनव विवाहबंधनात अडकले. नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता आणि अभिनव यांना मुलगा झाला. मात्र दोघांमधील मतभेदांमुळे ते वेगळे झाले.

हेही वाचा: 'राणादा'ने का घेतली आशुतोष गोवारीकरांची भेट?