Palak-Ibrahim Video : कितीही तोंड लपवलं तरी कळतचं! सैफच्या मुलाचा अन् श्वेता तिवारीच्या मुलीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

फ अली खानचा मुलगा इब्राहीम अली खान आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यांच्या अफेयर्सची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे.
Palak Tiwari And Ibrahim Ali Khan New Year Celebration Video
Palak Tiwari And Ibrahim Ali Khan New Year Celebration Video esakal

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan New Year Celebration Video : सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम अली खान आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यांच्या अफेयर्सची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वी त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. आताही एका व्हिडिओनं पुन्हा वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

न्यू इयर सेलिब्रेशनच्या निमित्तानं बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. त्यातून त्यांनी त्यांच्या लाखो चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. न्यू इयरचे स्वागत करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी विदेशात जाऊन तिथे व्हॅकेशन इंजॉय करत असल्याचे दिसून आले आहे. यात सध्या सैफच्या लेकाचा आणि श्वेताच्या लेकीच्या व्हिडिओनं चाहत्यांच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधून घेतले आहे.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका पार्टीत हे दोन्ही सेलिब्रेटी एकत्र आल्याचे दिसून आले. पापाराझ्झींनी कैद केलेल्या त्या व्हिडिओमध्ये कारमध्ये बसलेली पलक दिसून येते तर इब्राहिमनं आपला चेहरा झाकून घेतला आहे. मात्र नेटकऱ्यांनी आणि दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी त्याला ओळखले असून कमेंटमध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. अनेकांनी म्हणजे ती अफवा खरी होती तर...असे म्हणत त्यांच्या रिलेशनशिपवर कमेंट केल्या आहेत.

पापाराझ्झींनी पुन्हा एकदा त्यांना त्या सेलिब्रेटींना स्पॉट केल्यानं काही नेटकऱ्यांनी पापाराझ्झींची देखील शाळा घेतली आहे. खरं तर अजून इब्राहिम आणि पलक यांच्याकडून कोणत्याही प्रकारे त्यांच्या नात्याविषयी खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र पापाराझ्झींनी त्यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडिओ शेयर केल्यानं चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना त्यांच्या नात्याविषयी उत्सुकता आहे.

पलक च्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिनं गेल्या वर्षी सलमान खान सोबतत किसी का भाई किसी की जानमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं. भलेही त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारसी कमाई केली नसली तरी पलकच्या डेब्यूची चर्चा रंगली होती. चक्क भाईजान सलमानच्या चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला होता. यामुळे ती आणि तिचे चाहते कमालीच्या आनंदात होते.

इब्राहिम विषयी सांगायचं झाल्यास तो सध्या करण जोहरला असिस्ट करत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी समोर आली होती की, इब्राहिम आणि खूशी कपूर हे एका चित्रपटातून पदार्पण करणार असून त्यामध्ये ते एका रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan New Year Celebration Video
Nana Patekar Birthday : अतिशय गरीबीत गेलं नानांचं बालपण, रोज १६ किमी पायी चालत...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com