Pankaj Udhas Funeral : गझल सम्राट पंकज उधास यांना अखेरचा निरोप, बॉलीवूड सेलिब्रेटींना अश्रू अनावर!

गझल सम्राट पंकज उधास (Pankaj Udhas Funeral) यांना अखेरचा निरोप देताना चाहत्यांना शोक अनावर झाला होता...
Pankaj Udhas Funeral
Pankaj Udhas Funeral esakal

Pankaj Udhas Funeral News : प्रख्यात गायक आणि गझल सम्राट म्हणून लोकप्रिय असणाऱ्या पंकज उधास यांना अखेरचा निरोप (Pankaj Udhas Funeral News) देण्यात आला आहे. काल त्यांचे दुर्धर आजारानं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव निवासस्थानी ठेवण्यात आले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळीमधील हिंदू वैकुंठभूमी मध्ये (Pankaj Udhas Funeral ) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या हजारो चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर हजर असल्याचे दिसून आले.

वयाच्या ७२ व्या वर्षी उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही महिन्यांपासून पॅनक्रियाच्या कॅन्सरनं पीडीत होते असे त्यांचे मित्र गायक जलोटा यांनी सांगितले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन, शंकर महादेवन यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

Pankaj Udhas Funeral
Pankaj Udhas : 'आज की रात, बडी मुद्दतोंके बाद आयी है..'; रंकाळा महोत्सवात रंगली होती पंकज उधास यांची मैफल

पंकज उधास यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. यात प्रख्यात गायक सोनू निगम, अनुप जलोटा यांच्या नावाचा समावेश आहे. अनुप जलोटा यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेयर करत आपल्या लाडक्या मित्राच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी उधास यांचे निधन नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले याचा खुलासा केला होता.

Pankaj Udhas Funeral
Pankaj Udhas Death : ...आणि तेव्हा मी शहाणा झालो! बंदूकीच्या धाकावर पंकज उधास यांना का गायला लागली होती गझल?

पंकजजींच्या निधनानंतर संपूर्ण बॉलीवूड विश्वाला मोठा हादरा बसला आहे. त्यांचे निधन होताच अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. काल सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मुलीनं सोशल मीडियावर याबाबत माहिती देणारी पोस्ट व्हायरल केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com