पारस-माहिराचा म्युझिक व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना झाली 'बिग बॉस'ची आठवण

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 12 August 2020

'बिग बॉस'नंतर दोघेही एकमेकांसोबत म्युझिक व्हिडिओ करण्यात बिझी आहेत. आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबई- 'बिग बॉस'च्या १३ व्या सिझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल नंतर जी जोडी सर्वात जास्त चर्चेत होती ती म्हणजे पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा. दोघेही या शोमध्ये एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांच्या अफेअरच्या देखील खूप चर्चा होत्या मात्र दोघांनी अजुनही याबाबतची कबुली दिलेली नाही. 'बिग बॉस'नंतर दोघेही एकमेकांसोबत म्युझिक व्हिडिओ करण्यात बिझी आहेत. आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

हे ही वाचा: सुशांतच्या घरातून निघून गेल्यावर रियाने महेश भट्ट यांना केले होते ९ फोन, कॉल डिटेल्समधून खुलासा 

माहिरा शर्माने या व्हिडिओबाबत बोलताना सांगितलं आहे की या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या बिग बॉसच्या घरात असतानात्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत होत्या. रमन गोयलने गायलेल्या या 'रिंग' गाण्याच्या व्हिडिओमध्ये पारस आणि माहिराची बिग बॉसमधली केमस्ट्री दिसून येत आहे. ही जोडी चाहत्यांमध्ये 'पाहिरा' नावाने प्रसिद्ध आहे. 

माहिराने एका मुलाखतीत सांगितलं होतं की 'आम्ही चाहत्यांना या व्हिडिओमधून बिग बॉसची आठवण करु देऊ इच्छितो कारण आम्हाला दाखवायचं होतं की अभिनयाव्यतिरिक्त आम्ही आमच्या ख-या आयुष्यात कसे आहोत. लोकांनी आमच्या ज्या मस्ती आणि प्रेमाला पसंत केलं ते सगळं आम्ही या व्हिडिओमध्ये सादर केलं आहे. तसंच पारससोबत काम करणं नेहमीच आरामदायक असतं' असं माहिरा सांगते. 

यासोबतंच सध्या चंदीगढमध्ये असलेल्या माहिराने सांगितलं की, 'आम्ही कोरोना व्हायरसच्या कारणामुळे आत्ता खूप काही नाही करु शकत. टीव्ही शोसाठी देखील ऑफर्स आहेत पण मी रिस्क घेऊ शकत नाही. मी सध्या कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळण्याची वाट पाहत आहे. मात्र यादरम्यान आम्ही आमच्या म्युझिक व्हिडिओमधून आमच्या चाहत्यांचं मनोरंजन करत राहू पारससोबत अजुन काही म्युझिक व्हिडिओ येणार असल्याचंही तिने सांगितलं.'    

paras chhabra fans of mahira sharma remember bigg boss after seeing new song  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paras chhabra fans of mahira sharma remember bigg boss after seeing new song