"इश्‍कजादे' पुन्हा एकत्र 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

"इश्‍कजादे' चित्रपटाची हिट जोडी अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा पुन्हा एकत्र येत आहे. 2012 मध्ये आलेल्या "इश्‍कजादे'मध्ये दोघांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. परिणितीच्या कामाचीही तारीफ झाली होती.

"इश्‍कजादे' अर्जुनचा पहिलाच चित्रपट होता. परिणितीचीही मुख्य भूमिका असलेली ती पहिलीच फिल्म होती! त्यामुळे अर्जुन आता त्याच्या पहिल्या हिरोईनबरोबर परत येतोय. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित आणि यशराज फिल्म निर्मित चित्रपटात दोघे पुन्हा दिसतील. दिबाकर बॅनर्जी यांनी "यशराज'च्या "ब्योमकेश बक्षी'चं दिग्दर्शन केलंय.

आता त्यांच्या नव्या चित्रपटासाटी अर्जुन-परिणितीची जोडी जवळ जवळ फायनल झालीय. अर्जुन कपूर हरियाणवी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चित्रपटाचा हिरो पोलिस ऑफिसर म्हटल्यावर तो थ्रिलर असणार यात शंका नाही; पण परिणितीची भूमिका गुलदस्त्यात आहे. चित्रपट या वर्षीच प्रदर्शित होईल, असंही म्हटलं जात आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत कमबॅक करण्यासाठी परिणितीला एका हिटची गरज आहे. अर्जुन तिला लकी ठरतोय का, ते समजेलच...  

Web Title: parineeti chopra and arjun kapoor work