परिणिती चोप्रा करतेय 'या' व्यक्तीला डेट

परिणिती चोप्रा करतेय 'या' व्यक्तीला डेट

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा सतत सुरू असतात. सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या लव्ह लाइफ बद्दलही फारसं कोणाला माहित नाही. पण काही दिवसांपासून परिणिती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

परिणिती 2017पासून या व्यक्तीला डेट करत आहे. ही व्यक्ती इतर कोणी नाही तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर चरित देसाई आहे. परिणिती तिच्या रिलेशनशिप बद्दल कधीच बोलताना दिसत नाही. पण नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत परिणितीला चरित बाबत प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर बोलताना परिणिती म्हणाली, माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला सर्व माहित आहे. प्रियांका चोप्राच्या लग्नात चरित आणि परिणिती एकत्र दिसले होते.

परिणिती म्हणाली, मी कधी ही गोष्ट स्वीकारलीही नाही आणि नाकारली नाही. माझं कुटुंबं आणि मित्रपरिवार सर्वांना सत्य काय आहे हे माहित आहे. हे माझं खासगी आयुष्य आहे आणि म्हणूनच मला यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. चरित देसाईनं करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या अनेक सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे. याशिवाय त्यानं प्रियांका-हृतिकच्या अग्निपथ सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com