वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'परमाणु'चा टिझर रिलीज

शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला झालेल्या अणुचाचणीवर आधारीत सिनेमाचे कथानक आहे. 

या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सतत लांबणीवर जात होती. काही वादविवादांच्या भोवऱ्यातही सिनेमा सध्या अडकला आहे. सिनेमा निर्माती प्रेरणा अरोरा यांच्या क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीने जॉन अब्राहम विरोधात फसवणूक, पैशांची अफरातफर, कॉपीराईटचे उल्लंघन या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. जॉनने सिनेमाच्या नफ्याचा 50 टक्के भाग घेतल्यानंतर करार रद्द केला आहे, असा आरोप प्रेरणा अरोराने केला आहे. या प्रकरणात पोलिस लवकरच जॉनची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा लांबली आहे. 

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 8 डिसेंबर 2017 निश्चित करण्यात आली होती. पण 1 डिसेंबरला 'पद्मावत' प्रदर्शित होणार असल्याने हा सामना टाळण्यासाठी जॉनच्या टीमने रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवी तारीख 2 मार्च ठरवण्यात आली. पण यावेळी देखील अनुष्का शर्माच्या 'परी'सोबत सामना होणार होता. त्यामुळे क्रिअर्जने सिनेमाची तारीख पुन्हा बदलून आता 4 मे ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Parmanu Hindi Movie Teaser Out Today