esakal | पतौडी पॅलेस ते स्वित्झर्लंडमध्ये घर.. सैफ-करीना आहेत एवढ्या संपत्तीचे मालक
sakal

बोलून बातमी शोधा

saif kareena

तैमुरच्या नावावर आहे महाराष्ट्रातल्या जंगलातील जागा

पतौडी पॅलेस ते स्वित्झर्लंडमध्ये घर.. सैफ-करीना आहेत एवढ्या संपत्तीचे मालक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूडमधल्या आलिया भट्ट, आयुषमान खुराना आणि हृतिक रोशनप्रमाणे अभिनेता सैफ अली खान व त्याची पत्नी करीना कपूर खान यांनीसुद्धा २०२० मध्ये नवीन घर खरेदी केलं. दुसऱ्या बाळाच्या जन्मापूर्वीच सैफ-करीना तैमुरसह या नवीन घरात राहायला गेले. मुंबईतील वांद्रे परिसरातील फॉर्च्युन हाइट्समध्ये त्यांचं जुनं घर असून याच इमारतीच्या समोरील रस्त्यावर त्यांनी नवीन घर विकत घेतलंय. याशिवाय स्वित्झर्लंडमध्येही त्यांचं घर आहे. दरवर्षी फिरण्यासाठी सैफ-करीना स्वित्झर्लंडला आवर्जून जातात. 

सैफ व करीनाचा चार वर्षांचा मुलगा तैमुरसुद्धा एक हजार स्क्वेअर फूट इस्टेटचा मालक आहे. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरने त्याच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील छोट्या जंगलाची जागा त्याच्या नावावर भेट म्हणून दिली. सैफच्या मुंबईतील नवीन घराचं इंटेरिअर डेकोरेशन दर्शिनी शाह यांनी केलं आहे. करीनाने त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या घरात स्विमिंग पूल, नर्सरी, सैफसाठी मोठी लायब्ररी आणि आऊटडोअर सिटींग एरियाचा समावेश आहे. 

हेही वाचा :'एक जमाना था जब हम भी..'; लहान भावाच्या जन्मानंतर तैमुरवरून भन्नाट मीम्स व्हायरल 

हेही वाचा :

सैफ हा पटौदीच्या शेवटच्या नवाबांचा मुलगा आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. सैफने २०१४ मध्ये हरयाणामधील वडिलोपार्जित घर पुन्हा मिळवलं. जवळपास दहा एकरांत पसरलेल्या या संपत्तीची किंमत ८०० कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये १५० रुम्स, सात ड्रेसिंग रुम्स, सात बेडरुम्स आणि सात बिलियर्ड रुम्स आहेत. सैफच्या 'तांडव' या वेब सीरिजची शूटिंग याच पॅलेसमध्ये झाली होती.  

हेही वाचा : 'हक्काचा पैसा भीक मागितल्यासारखा...'; शर्मिष्ठा राऊतचा मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप

याशिवाय स्वित्झर्लंडमधील Gstaad या ठिकाणी सैफ व करीनाचं घर आहे. करीना व सैफ बऱ्याचदा तिथे फिरायला जातात. इतकंच नव्हे तर कौटुंबिक सहलींसाठीही त्यांच्याकडून ही जागा अनेकदा निवडली जाते.