Pathaan: साध्वी प्राची यांना 'पठाण' ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग पचेना! ट्विट करत म्हणाल्या, 'शाहरुख तू' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Controversy
Sadhvi Prachi on Pathaan

Pathaan: साध्वी प्राची यांना 'पठाण' ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग पचेना! ट्विट करत म्हणाल्या, 'शाहरुख तू'

Sadhvi Prachi on Pathaan: शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळणार आहे. शुक्रवारपासून देशभरात या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून तिकीट विक्रीचा वेग पाहता हा चित्रपट इतिहास रचणार असल्याचे दिसते. एकीकडे चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही जोरात सुरू आहे.

हेही वाचा: Shahrukh Khan: बादशाहचं तो!  'पठाण'चं ट्रेलर झळकलं बुर्ज खलिफावर

मात्र तरीही चित्रपटाला होणारा विरोध थांबण्याचे नाव घेत नाहीये. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची या चित्रपटाबाबत सातत्याने वक्तव्य करीत आहेत. अलीकडेच त्यानी ट्विटरवर 'पठाण'च्या आगाऊ बुकिंगचा उल्लेख करत पुन्हा शाहरुख खानची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा: Pathaan Controversy: गुजरातमध्ये 'पठाण'साठी पोलीस कर्मचारी लागले कामाला...

साध्वी प्राची यांनी लिहिले आहे की, “जर पठाणला इतके बंपर अॅडव्हान्स बुकिंग मिळत असेल तर पीव्हीआर स्टॉक का घसरले? शाहरुख खान, तू कितीही पैसे गुंतवलेस तरी आता पब्लिकला पप्पू बनवू शकत नाही". त्याच्या या ट्विटवर अनेकांनी साध्वी यांना पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी काहींनी त्याच्यावर ताशेरेही ओढलेही आहे.

एका युजरने लिहिले, "प्राची पप्पू तुम हो और पब्लिक को बना रही हो. शाहरुख खानच्या खर्चावर पीव्हीआर चालत नाही." तर दुसऱ्याने लिहिले, "चित्रपट बनवणाऱ्यापेक्षा तर तुम्हीच पठाणचे प्रमोशन जास्त करत आहात. चालू ठेवा तुम्ही चांगलं करत आहात." तर एकानं लिहिलयं, "अहो दीदी विनेश फोगट आपल्या हक्कांसाठी जंतरमंतरवर बसल्या आहेत. जर तुम्ही पठाणवर बहिष्कार टाकून झाला असेल तर त्या महिलांसाठीही 2 ट्विट करा."

हेही वाचा: Sushant Singh Rajput Birthday: रियापेक्षाही 'या' महिला होत्या सुशांतच्या जीवनात खास...

लोकांनी कितीही विरोध केला तरी शाहरुख खानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आहे. त्याच्याशिवाय जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिकेत आहे