Sushant Singh Rajput Birthday: रियापेक्षाही 'या' महिला होत्या सुशांतच्या जीवनात खास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant Singh Rajput Birthday

Sushant Singh Rajput Birthday: रियापेक्षाही 'या' महिला होत्या सुशांतच्या जीवनात खास...

दिवंगत सुशांत सिंग राजपूत यांचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला. आज तो आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी, त्याचे चित्रपट यांच्या माध्यमातुन तो त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तो आजही त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. 14 जून 2020 रोजी अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.

हेही वाचा: Bigg Boss 16: 'मुझे घर जाना है' टिनाला आता सहन होईना! ढसाढसा रडली...

त्याच्या निधनांनतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीबद्दल खूपच चर्चा झाली. सुशांतच्या आयुष्यात फक्त दोनच महिलांची नावांची जास्त चर्चा झाली होती, त्यात एक रिया चक्रवर्ती आणि दुसरी होती अंकिता लोखंडे.

पण या व्यतिरिक्त सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यात काही महिला होत्या ज्यांच्याशी त्याचे नाव जोडले गेले. आज आम्ही तुम्हाला सुशांत सिंह राजपूतच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत.

हेही वाचा: Sushant Singh Rajput: सुशांतच्या आठवणीत रमली बहिण व्हिडिओ आणि ट्विट करत केलं भावनिक आवाहन

अंकिता लोखंडे:

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या लव्ह लाईफची चर्चा तर चांगलिच गाजली होती. त्याची सुरुवात पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेतून झाली. हे नाते 6 वर्षे टिकले. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि आणि काही कारणांने ते तुटलं.

सुशांतच्या 'काई पो चे' या चित्रपटातून त्याला बरीच ओळख मिळाली आणि चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. यानंतर सुशांतची गणना इंडस्ट्रीतील बड्या स्टार्समध्ये केली जाऊ लागली. सुशांतच्या महिला फॅन फॉलोइंगवरून दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर दोघांचे संमतीने ब्रेकअप झाले.

हेही वाचा: Sushant Singh Rajput: 'सुशांत मृत्यूमागे मागे मोठं षडयंत्र'... वकिलाचा गौप्यस्फोट

क्रिती सॅनन:

अंकिता लोखंडेनंतर सुशांत सिंग राजपूतचे नाव क्रिती सेनॉनसोबत जोडले गेले. 'राबता' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी या दोघांची लव्ह लाईफ चर्चेत आली होती. मात्र दोघांपैकी कोणीही याबाबत काही बोललं नाही.

सारा अली खान:

मिडिया रिपोर्टनुसार, 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि सारा यांच्यात जवळिक वाढली. काही दिवस ते डेट करत होते. या चित्रपटातही दोघांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली होती. मात्र त्यानंतर दोघांच्या जोडीचं पुढे काही होऊ शकलं नाही. यानंतर सारा अली खानने काही काळ कार्तिक आर्यनला डेट करायला सुरुवात केली असं बोललं जातं.

हेही वाचा: Urfi Javed video: 'माझ्यापेक्षा मोठी चेटकीण'..उर्फीचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांना अप्रत्यक्ष टोला

रिया चक्रवर्ती :

एका चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान सुशांत सिंग राजपूतने रिया चक्रवर्तीची भेट झाली. सुशांत आणि रियाची जोडी खूप चांगली होती आणि दोघेही जवळपास दिड वर्षे ते एकत्र राहिले. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी रिया आणि सुशांतचं ब्रेकअप झालं होतं.

सुशांतने हे पाऊल उचलण्याच्या काही दिवस आधी रियाने सुशांतचा फ्लॅट सोडला होता आणि यामुळे सुशांत देखील डिप्रेशनमध्ये जात होता. असं दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.