
Shah Rukh Khan : 'पठाण'ला दिलेला शब्द शेवटी पाळलाच! आदित्य चोप्रानं 30 वर्षांपूर्वी म्हटलं होतं...
Pathaan Movie Aditya Chopra Producer shah rukh khan : बॉलीवूड किंग खान शाहरुखचा पठाण हा सध्या विक्रमी कमाई करताना दिसतो आहे.तब्बल चार वर्षांच्या ब्रेक नंतर आलेल्या शाहरुखच्या या चित्रपटानं त्याच्या चाहत्यांना वेड लावलं आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणनं वेगवेगळे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. आता तर आमिर खानच्या दंगलच रेकॉर्डही शाहरुखनं मोडलं आहे.
देशभरातून शाहरुखच्या पठाणला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. ज्या नेटकऱ्यांनी , राजकीय संघटना आणि पक्षांनी या चित्रपटावरुन वाद तयार केला होता त्याला चाहत्यांनी, प्रेक्षकांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यासगळ्यात शाहरुखनं देखील चाहत्यांना धन्यवाद दिले आहे. प्रेक्षकांनी पठाणला स्विकारले यातच सगळे आले. मी त्यांचा आभारी आहे. या शब्दांत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
यश चोप्रा आणि शाहरुखचं नातं हे अनेकांना माहिती आहे. आतापर्यत शाहरुखच्या टॉपच्या चित्रपटांमध्ये यश प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे मोठे योगदान आहे. यासगळ्यात पठाणचे निर्माते आदित्य चोप्रा यांनी शाहरुखला तीस वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला आहे. सोशल मीडियावर या बातमीची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आदित्य यांनी तीस वर्षांपूर्वीच शाहरुखच्या चित्रपटावर २५० कोटी खर्च करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचे शाहरुखच्या चाहत्यांना मोठे कुतूहल आहे.
एका मुलाखतीमध्ये शाहरुखनं याविषयी खुलासा केला होता. तो म्हणाला, आदित्यनं दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या वेळी एका अॅक्शन चित्रपटाविषयी सांगितले होते. त्यानं मला त्या स्क्रिप्ट ऐकायलाही बोलावले होते. तो काय सांगतो हे मला तेव्हा फारसे कळले नाही. मात्र त्याच्या त्या स्क्रिप्टचे कौतूक वाटले होते. आज ती कथा आणि तो चित्रपट तुमच्यासमोर आहे. असे शाहरुखनं सांगितल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.
शाहरुख म्हणाला, मला आदित्यचा फोन आला होता. तो म्हणाला आपल्याला एक अॅक्शन फिल्म तयार करायची आहे. मला देखील त्यावेळी अॅक्शन फिल्म करायची होती. मात्र तेव्हा ते शक्य झाले नाही. बाकीचेही प्रोजेक्टस होते. मला आठवतंय की आदित्यनं ती स्क्रिप्ट मुंबईतील मेहमूद स्टुडिओमध्ये सांगितली होती. मला तेव्हा कुणीही अॅक्शनपटामध्ये घेईल असे वाटले नव्हते. आदित्यनं मात्र तीस वर्षांपूर्वीच आपल्या त्या स्टोरीचे बजेटही सांगून टाकले होते.
मला आदित्यला धन्यवाद द्यायचे आहे की, त्यानं तीस वर्षांपूर्वी दिलेला शब्द हा खरा केला. त्यानं जी कथा सांगितली होती ती आता चाहत्यांना, प्रेक्षकांना कमालीची आवडली आहे. त्यानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. मला आणि पुजा ददलानीला त्यानं ती कथा पुन्हा ऐकवली. तेव्हा मला ते खोटं वाटलं. पण ते खरं होतं. अशा शब्दांत किंग खाननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.