कुणी कितीपण लावा शक्ती, बॉक्स ऑफिसवर पठाणचीच मस्ती! 500 कोटींची कमाई| Pathaan World Wide Collection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan World Wide Collection

Pathaan World Wide Collection : कुणी कितीपण लावा शक्ती, बॉक्स ऑफिसवर पठाणचीच मस्ती! 500 कोटींची कमाई

Pathaan Shah Rukh Khan Movie collection cross 500 core : बॉलीवूडच्या किंग खानच्या पठाणनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलीवूडमध्ये पठाणनं कमाईचे वेगवेगळे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. प्रदर्शनापूर्वीच मोठ्या वादात सापडलेल्या पठाणकडून एवढ्या मोठ्या कमाईची अपेक्षा कुणीही केली नव्हती. मात्र किंग खाननं आपल्या चित्रपटातून ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आशुतोष राणा, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या पठाणचा बॉक्स ऑफिसवर डंका असल्याचे दिसून आले आहे. तीन दिवसांत या चित्रपटानं देशभरातून शंभर कोटींचा गल्ला जमवला होता. तर जगभरातून हा आकडा दोनशे कोटींच्या पुढे गेला होता. आता एक नवीन माहिती समोर आली असून पठाणनं वेगळाच विक्रम आपल्या नावावर केल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

Also Read - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये पठाणला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याचे तोंड भरुन कौतूक केले आहे. दीपिकाची स्तुती केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये अजुनही पठाण चित्रपटाला मोठा विरोध होत असला तरी त्याचा कोणताही फरक चित्रपटावर झाल्याचे दिसत नाही. याउलट प्रेक्षकांचा वारेमाप प्रतिसाद चित्रपटाला मिळाला आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटानं जगभरातून पाचशे कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. अवघ्या पाचव्या दिवशीच पठाणनं केलेली कमाई ही सगळ्यांच्या नजरेत भरली आहे. ज्यांनी या चित्रपटाला नावं ठेवली, त्याला ट्रोल केले, काहींनी तर काही झाले तरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यांना या कमाईच्या आकड्यानं सणसणीत उत्तर दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पठाणनं आतापर्यत जगभरातून ५५० कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी पठाणनं देशभरातून ८० कोटींची कमाई केली होती. सध्या देशात सुरु असणाऱ्या पठाण फिव्हरनं ट्रोलर्सची झोप उडवली आहे.