पत्रलेखाच्या लग्नातील साडीवर असं काय लिहिलेलं होतं ज्याची सर्वत्र होतेय चर्चा? | Rajkummar Rao | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajkummar Rao and Patralekha

पत्रलेखाच्या लग्नातील साडीवर असं काय लिहिलेलं होतं ज्याची सर्वत्र होतेय चर्चा?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव Rajkummar Rao याने गर्लफ्रेंड पत्रलेखाशी Patralekha लग्नगाठ बांधली. १५ नोव्हेंबर रोजी चंदिगडमध्ये हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकुमार आणि पत्रलेखा यांचे कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. जवळपास ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. राजकुमार आणि पत्रलेखा या दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे खास क्षण शेअर केले आहेत. प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने Sabyasachi Mukherjee या दोघांचे कपडे डिझाइन केले होते. या फोटोंमधील पत्रलेखाच्या साडीवर नेटकऱ्यांचं लक्ष खिळून राहिलं. या साडीवर लिहिलेल्या विशेष मजकूराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लग्नसोहळ्यात राजकुमारने सिल्क कुर्ता, चुडीदार, गुलाबी दुपट्टा आणि त्यावर लाल रंगाची पगडी असा लूक केला होता. तर पत्रलेखाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. या साडीच्या बॉर्डरवर बंगाली भाषेत एक मजकूर लिहिलेला होता. या मजकूराचा नेमका अर्थ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. 'मी माझं सर्व प्रेम तुझ्यासाठी अर्पण करते', असा या मजकूराचा अर्थ आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: 'हा' लोकप्रिय स्पर्धक पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार?

'११ वर्षांच्या प्रेम, रोमान्स आणि मैत्रीनंतर अखेर मी माझ्या सर्वांत चांगल्या मैत्रिणीशी, माझ्या जोडीदाराशी लग्न केलं', अशा शब्दांत राजकुमारने प्रेम व्यक्त केलं. 'सिटीलाइट्स' या चित्रपटात दोघांनी ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारली होती. काही वर्षे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर 'बोस' या वेब सीरिजसाठीमध्येही दोघांनी एकत्र काम केलं. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान राजकुमारने पत्रलेखाला पाहिलं होतं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता.

loading image
go to top