esakal | पवित्रा म्हणाली,‘एजाजच्या धर्मामुळे माझ्या आईला चिंता वाटते’

बोलून बातमी शोधा

पवित्रा म्हणाली,‘एजाजच्या धर्मामुळे माझ्या आईला चिंता वाटते’

पवित्रा म्हणाली,‘एजाजच्या धर्मामुळे माझ्या आईला चिंता वाटते’

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - सर्वात चर्चेत असणारा छोट्या पडद्यावरील शो म्हणजे बिग बॉस या शोमधील सदस्य कधी एकमेकांसोबत भांडतात तर कधी त्यांच्यामध्ये मैत्री होते. बिग बॉसच्या घरात असताना या शो मधील अनेक सदस्य प्रेमात पडले. अनेक दिवस एकमेकांच्या सहवासात राहिल्याने या स्पर्धकांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. असेच एक बिग बॉसच्या घारातील क्युट कपल म्हणजे अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान. हे दोघे बिग बॉसच्या घरत असताना एकमेकमेकांच्या प्रेमात पडले. हा शो संपल्यानंतर देखील त्यांनी आपल्या नात्याची कबूली का प्रेस कॅन्फरेन्समध्ये दिली.

पवित्रा आणि एजाज सोशल मीडियावर सक्रिय असातात. लॉकडाऊनमध्ये पवित्राने एजाजचे घारात काम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत पवित्राला दोघांच्या नात्याच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा पवित्राने एक धक्कादायक वक्तव्य केले.

हेही वाचा: 'आधी तुझ्या सिनेमांच्या तिकिटांबद्दल बोल'; लशीच्या किंमतीबद्दल बोलणारा फरहान ट्रोल

मुलाखतीमध्ये पवित्राला तिच्या आणि एजाजच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी पवित्रा म्हणाली, ‘एजाज आणि माझ्या कुटुंबाला आमच्याबद्दल माहित आहे. एजाजचे भाऊ आणि वडिलांनी आम्हाला बिग बॉसमध्ये पाहिलं आहे. एवढंच नाही तर माझा भाऊ देखील एजाजला ओळखतो. तो माझ्यासोबत असल्यामुळे एजाजला बऱ्याचदा भेटला आहे, एजाज पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतून आला आहे. त्यामुळे माझी आई याबद्दल थोडी चिंतेत आहे कारण . माझ्या आईला वाटते की आम्ही आधी एकमेकांना चांगलं ओळखायला हवं, एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे. माझे वडील आनंदात आहेत. जरी मी लिव्ह-इनमध्ये राहिली तरी त्यांना काही अडचण नाही आहे. पण, कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी त्यांना विचारण हे महत्त्वाचं आहे. एजाजला पण असचं वाटतं आणि त्यांना ठावूक आहे की आम्ही दोघेही वेगवेगळ्या धर्मातून येतो. प्रत्येक व्यक्ती आमच्या रिलेशनशिपमुळे आनंदी आहे. परंतु प्रत्येकाला वाटतं की आम्ही हळूहळू पुढे जायला हवं आणि एकमेकांना खूप वेळ द्यावा.’

धर्मामुळे एजाज आणि तिने लग्नाचा विचार अजून केला नाही असे मुलाखतीत पवित्राने सांगितले. पवित्राचे मुलाखतीत सांगितलेले ऐकून पवित्रा आणि ऐजाजचे चाहते थोडे नाराज झाले आहेत.