
एकेकाळी गुरूद्वारामधील लंगर खाऊन भरलं पोट...'पावनखिंड' फेम अंकित मोहनने सांगितला जीवनप्रवास
'पावनखिंड फेम' सध्या त्याच्या भूमिकेसाठी चांगलाच चर्चेत आहे.(Bollywood)अनेक मालिकांमधे काम करणाऱ्या अंकितने नुकताच त्याचा जीवनप्रवास एका मुलाखतीत सांगितला.अंकितला एकाएकी प्रसिद्धी मिळाली नाही.त्याचा हा संघर्ष तब्बल १६ वर्षांचा होता.त्याच्या प्रवासाविषयी बोलताना त्याच्या संघर्षाला त्याने खिळ्याची उपमा दिली आहे.
'खिळा रूतलेला आहे आता फक्त ठोकायचा बाकी आहे.'असं त्याच्या प्रवासाविषयी बोलताना तो म्हणाला.पावनखिंड या चित्रपटात अंकितने रायाजी बांदलची भूमिका साकारली .त्याने बेगूसराय,नागिन ३ यांसारख्या मालिंकामधेही काम केले आहे.(NaGin 3 Actor)मात्र २०१८ मधील 'फर्जंद' या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली.त्याच्या १६ वर्षांच्या खडतर प्रवासाविषयी बोलताना तो म्हणतो एकेकाळी गुरूद्वारामधील लंगर खाऊन मी पोट भरलं.
पुढे तो म्हणतो,"कधी कधी तर मी उपाशीही काम केलं आहे.ऑडिशनसाठीही बरेचदा पायी गेलो.त्यावेळचा त्याचा प्रत्येक दिवस हा कष्टाचा आणि अवघड होता.पीजी मधे राहाताना मला तिथेही वाईट वागणुकीला सामोरे जावे लागले.(Ankit Mohan)कधी कधी तर १०-२० रूपयांवर मी दिवस काढलेत.अकाऊंटमधे मोजकेच पैसे असायचे त्यातही हाती काम नसायचं.ऑडिशनलाही यश मिळायचं नाही.अशा खडतर प्रवासातून त्याला सामोरे जावं लागल," असं तो म्हणतो.
हेही वाचा: Ankit Mohan New Movie | BABU | ’बाबू' शेठचा जलवा आता लवकरच | Sakal Media |
अंकीत यावेळी मागील काळातील त्याच्या स्वभावाविषयीही सहजपणे व्यक्त झाला.एका व्यक्तीला तो रागात म्हणाला, 'होता मी रीयालिटी शो मधे काम केलंय माझ्याशी सांभाळून बोल.त्यावेळी त्या व्यक्तीने ही फार जुनी गोष्ट झाली आता काय करतोय असे त्याला उत्तर दिले होते.त्यावेळी तो निशब्द झाला होता.माणसाने खचून न जाता सतत मेहनत करावी.' असेही तो म्हणाला.
Web Title: Pawankhind Fem Ankit Mohan Shared His Struggle Days Experience In An Interview
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..