esakal | पर्ल वी पुरीला न्यायालयाचा दणका, दुस-यांदा जामीन फेटाळला
sakal

बोलून बातमी शोधा

Pearl v puri

पर्ल वी पुरीला न्यायालयाचा दणका, दुस-यांदा जामीन फेटाळला

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या टीव्ही कलाकार पर्ल वी पुरीला (pearl v puri) न्यायालयानं दणका दिला आहे. त्यानं जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयानं दुस-यांदा फेटाळला (bail not granted) आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर घेतली गेली असून पर्ल वी पुरीच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. नागिन या मालिकेतून प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवणारा कलाकार पर्ल वी पुरीला अनेक सेलिब्रेटींनी पाठींबा दिला आहे. (pearl v puri denied bail again in minor physical assault case)

कोर्टानं पर्ल वी पुरीचा (second time court refuses bail of pearl) जामिनाचा अर्ज दुस-यांदा फेटाळला आहे. त्याच्या या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 15 जुनला होणार आहे. पर्लला 4 जुन रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या आई वडिलांनी याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर विरार पोलिसांनी पर्लवर गुन्हा दाखल केला होता.

यापूर्वी 5 जुनला पर्ल कोर्टात दाखल झाला होता. त्यावेळी त्याच्या जामिनाची याचिका कोर्टानं फेटाळली होती. त्यानंतर त्याला ज्युडिशिअल कोर्टात पाठवण्यात आले होते. तिथेही पर्लनं जामिनासाठी अर्ज केला होता. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला होणार आहे. दरम्यानच्या काळात पर्लच्या याप्रकरणानं वेगवेगळी वळणं घेतली आहेत. काही वेळापूर्वी त्या पीडीतेच्या आईनं पर्ल निर्दोष असल्याचे सांगितले होते. तिनं काही केले नाही. मुलीच्या वडिलांना तिची कस्टडी हवी असल्यानं त्यांनी पर्ल पुरीला टार्गेट केले असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: हिमेश रेशमियाँचं 'सुरूर २०२१' गाणं प्रदर्शित; चाहत्यांचे भरभरून कमेंट्स

हेही वाचा: 'माझ्यावरील गाणं रिलीज तर कर, मग तुला सांगतो'....

यापूर्वी पर्लला अनेक सेलिब्रेटींनी सपोर्ट केले होते. त्यात एकता कपूर, निर्माती, अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांचाही समावेश आहे. एकता कपूरची एक पोस्टही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यावेळी तिनं पर्लवर झालेले आरोप खोटे असल्याचे सांगितले होते.