esakal | रिया चक्रवर्तीने केला सुप्रीम कोर्टात अर्ज, सीबीआय तपासाची मागणी करणारी आता म्हणतेय 'तपास मुंबई पोलिसांकडेच द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

rhea chakraborty

सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता रिया चक्रवर्तीने पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.

रिया चक्रवर्तीने केला सुप्रीम कोर्टात अर्ज, सीबीआय तपासाची मागणी करणारी आता म्हणतेय 'तपास मुंबई पोलिसांकडेच द्या'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला रविवारी आत्महत्या केली. त्यानंतर आता गेल्या रविवारी सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि अन्य सहा जणांविरोधात पटनामध्ये एफआयआर दाखल केली. रिया सुशांतची गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता रिया चक्रवर्तीने पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.

हे ही वाचा: मुंबई पोलिसांबाबत सुशांतच्या वकिलाचा खुलासा, सुशांतच्या कुटुंबावर टाकत होते 'या' गोष्टीचा दबाव

रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी म्हटलंय की 'या अर्जामध्ये पटनामध्ये दाखल केलेल्या प्रकरणाचा तपास मुंबईमध्ये ट्रान्सफर करावा अशी मागणी केली आहे.' काही दिवसांपूर्वी स्वतः रियाने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. आणि आता तीने सुप्रिम कोर्टात याऊलट अर्ज केल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत. 

सुशांतच्या वडिलांनी पटना शहरातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६ आणि ४२० अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे पटना पोलिसांची स्पेशल टीम मुंबईत दाखल झाली आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता मुंबई पोलीस आणि पटना पोलीस यांच्यामध्ये मतभेद होत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. 

सुशांत प्रकरणात जेव्हा पटना पोलीस मुंबई पोलीस डीसीपी जे ही केस हाताळत आहेत त्यांना भेटले तेव्हा त्यांनी पटना पोलिसांना पूर्णपणे मदत करण्याचं आश्वासन दिलं मात्र कोणत्याही प्रकारची कागदपत्र देण्यास नकार दिला. कागदपत्र मिळवण्यासाठी त्यांना डीसीपी क्राईम ब्रांचला भेटण्यासाठी सांगितलं. यानंतर जेव्हा पटना पोलीसांची टीम मुंबई क्राईम ब्रांचचे डिसीपी अकबर पठान यांच्या अंधेरी येथे कार्यालयात पोहोचली तेव्हा तिथे त्यांना भेटण्यासाठी अनेक तास वाट पहावी लागली. सुत्रांच्या माहितीनुसार या टीमकडूनही पटना पोलिसांना केवळ मदत करण्याचं आश्वासनंच दिलं गेलं आहे.   

petition filed by rhea chakraborty lawyer in supreme court seeking transfer of investigation in actor death