मुंबई पोलिसांबाबत सुशांतच्या वकिलांचा मोठा खुलासा, सुशांतच्या कुटुंबावर टाकत होते 'या' गोष्टीचा दबाव

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 29 July 2020

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या वकिलांनी खुलासा केला आहे की आत्ता एफआयआर दाखल झाली आहे कारण मुंबई पोलीस एफआयआर दाखल करुन घेत नव्हते.

मुंबई- सुशांत सिंह राजपूतचे वडिल केके सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. ही एफआयआर पटनामध्ये दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या वकिलांनी खुलासा केला आहे की आत्ता एफआयआर दाखल झाली आहे कारण मुंबई पोलीस एफआयआर दाखल करुन घेत नव्हते. आणि सुशांतच्या कुटुंबावर बड्या प्रोडक्शन हाऊसची नांव घेण्यासाठी दबाव टाकत होते जेणेकरुन हा तपास वेगळ्या दिशेला भरकटेल. 

सुशांत आत्महत्या प्रकरण: बिहार पोलिसांची स्पेशल टीम मुंबई क्राईम ब्रांच ऑफीमध्ये पोहोचली, तपास सुरु

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वकिल विकास सिंह यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितलं की 'एफआयआर दाखल करण्यासाठी ४४ दिवस यासाठी लागले कारण मुंबई पोलिस एफआयआर दाखल करुन घेत नव्हते. पटना पोलिस देखील घाबरत होते. मात्र मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि मंत्री संजय झा यांनी समजवल्यानंतर पटना पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतली. सुशांतच्या वडिल्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की या प्रकरणाचा तपास पटना पोलिसांनी करावा. कुटुंबाने आत्तपर्यंत सीबीआय तपासाची मागणी केलेली नाही.'

सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना देखील धन्यवाद दिले आहेत. तर पटनाचे शहर सीपी विनय तिवारी यांनी सांगितलं की 'एफआयआर दाखल झाली आहे. तपास सुरु आहे. मात्र या क्षणी हे सांगणं योग्य ठरणार नाही की कोणावर प्रश्न उपस्थित केले जातील. सुशांतच्या वडिलांनी ज्यांची नावं दिली आहेत त्या सगळ्यांविरोधात तक्रार दाखल झाली आहे.'    

sushants lawyer says mumbai police was not registering fir but forcing to take name of big production houses  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushants lawyer says mumbai police was not registering fir but forcing to take name of big production houses