Video: 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात..'; समृद्धी केळकरचा डान्स तुफान व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Kelkar

Video: 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात..'; समृद्धी केळकरचा डान्स तुफान व्हायरल

'फुलाला सुगंध मातीचा' Phulala Sugandh Maticha या मालिकेत किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर Samruddhi Kelkar सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. शूटिंगदरम्यान फावल्या वेळेत ती तिच्या डान्सचे व्हिडीओ शूट करते आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. तिच्या डान्सचे चाहते अनेक असून तिचे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. समृद्धीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. इन्स्टा रिल Insta reels व्हिडीओत ट्रेंडमध्ये असलेल्या 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना' या गाण्यात तिने अफलातून डान्स केला आहे. (phulala sugandh maticha fame samrudhhi kelkar dance video viral)

एरव्ही मालिकेत समृद्धी ही अत्यंत साध्या भोळ्या स्वभावाची आणि साडीत वावरताना दिसते. मात्र या व्हिडीओतील तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. समृद्धीच्या अनेक फॅनपेजेसवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. समृद्धीला अभिनयासोबतच नृत्याची फार आवड आहे. तिने कथ्थक नृत्याचं प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे. लॉकडाउनच्या काळात शूटिंग बंद असताना तिने अनेक मुलांना डान्स शिकवला.

हेही वाचा : 'गाढवांनो, मूर्खांनो..'; ट्रोलर्सना सुनावताना ढासळला सोनू निगमचा तोल

'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या किर्तीची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. किर्तीचं लग्न जिजी अक्कांचा मुलगा शुभमशी केलं जातं. लग्नापूर्वी जिजी अक्कांना किर्तीच्या शिक्षणाविषयी आणि तिच्या स्वप्नाविषयी किंचितही कल्पना नसते. मात्र जेव्हा त्यांना याबद्दल समजतं, तेव्हा नेमकं काय होतं, हे या मालिकेत पाहायला मिळतं.

Web Title: Phulala Sugandh Maticha Fame Samrudhhi Kelkar Dance Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top