PIFF 2022: सत्यजित रे, पद्मश्री साहीर लुधियानवी 'स्पेशल'

देशभरात आपल्या वेगळेपणामुळे नेहमीच चर्चेत असणारा फिल्म फेस्टिव्हल म्हणून पिफच्या नावाचा उल्लेख होत असतो.
Piff 2022
Piff 2022

Entertainment News: देशभरात आपल्या वेगळेपणामुळे नेहमीच चर्चेत असणारा फिल्म फेस्टिव्हल म्हणून पिफच्या नावाचा उल्लेख होत असतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. मागच्या पीफमध्ये मराठी हिंदी चित्रपटातील (Bollywood News) प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना गौरविण्यात आले होते. यंदाच्या पीफची (Piff 2022) नावनोंदणी 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, वेस्टएंड मॉल - औंध येथील सिनेपोलीस आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ३ ठिकाणच्या ८ पडद्यांवर दाखविले जाणार महोत्सवातील चित्रपट वर्ल्ड कॉमपिटीशन श्रेणीत निवडल्या गेलेल्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात ‘पिफ २०२२’ च्या नोंदणी प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होत आहे. तसेच यंदाचा पिफ चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन माध्यमातून देखील आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल (Dr.Jabbar Patel) यांनी पत्रकार परिषेदत दिली. यावेळी पिफच्या आयोजन समितीचे सदस्य रवी गुप्ता, अभिजित रणदिवे, सतीश आळेकर, समर नखाते आणि मकरंद साठे आदी उपस्थित होते.

Piff 2022
Video Viral: पहाटेच्या अंधारात विकी-कतरिनाची लपाछपी

यंदाच्या पिफची थीम ही भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, चित्रपट क्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तीमत्व भारतरत्न सत्यजित रे आणि प्रसिद्ध गीतकार पद्मश्री साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी वर आधारित असेल आणि त्यानुसार महोत्सवादरम्यान काही विशेष कार्यक्रम करण्यात येतील व त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल असे डॉ. पटेल यांनी यावेळी सांगितले. २० वा पिफ दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी चित्रपट महोत्सवाच्या संकेत स्थळाच्या www.piffindia.com माध्यमातून उद्या दिनांक दि. १५ फेब्रुवारी पासून करता येईल. पिफ होणाऱ्या काळात राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन चित्रपटगृहात करण्यात येईल.

Piff 2022
PIFF 2021 : मनातील कथा प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी चित्रपट प्रभावी माध्यम

पीफमध्ये काय पाहाल?

वर्ल्ड कॉम्पिटिशन श्रेणीत निवडल्या गेलेल्या चित्रपटांची यादी-

इरेझिंग फ्रँक (हंगेरी), १०७ मदर्स (स्लोवाकिया, झेक प्रजासत्ताक, युक्रेन), मैक्साबेल (स्पेन), द एक्झाम (जर्मनी, इराक, कुर्दिस्तान, कतार), प्ले ग्राउंड (बेल्जीयम), फ्रान्स (फ्रान्स), द लेजनिअर (इटली, फ्रान्स), अॅज फार अॅज आय कॅन वॉक (सर्बिया, फ्रान्स, बल्गेरिया, लक्झेमबर्ग, लिथुएनिआ), मिरर्स इन द डार्क (झेक प्रजासत्ताक), सबमिशन (पोर्तुगाल, फ्रान्स), जय भीम (भारत), अमीरा (इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमीरात, सौदी अरेबिया), बिटवीन टू डॉन्स (तुर्कस्तान, रोमेनिया, फ्रान्स, स्पेन) आणि हाउस अरेस्ट (रशिया) या १४ चित्रपटांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com