
नोलानच्या टेनेट या चित्रपटात भारतीय अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनीही भूमिका केली आहे. त्यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी नोलान समवेत काम करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेयर केला होता.
मुंबई : आपल्या चित्रपटातून जगभरातल्या जाणकार प्रेक्षकांना वेड लावणारा दिग्दर्शक म्हणून हॉलिवूडच्या ख्रिस्तोफर नोलनचे नाव घेतले जाते. गेल्या वर्षी त्याचा टीनेट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. आगळे वेगळे कथानक त्याची अवाक करणारी मांडणी, जबरदस्त अनुभव देणारे छायांकन यामुळे त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.
साय फाय प्रकारातील चित्रपट बनविण्यात हातखंडा असणाऱ्या नोलानला आता भारतात येऊन चित्रपट बनवायचा आहे. त्यानं त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली इच्छा व्यक्त केली आहे.
नोलानला भारत आणि भारतातील लोक फार भावले आहेत. त्यामुळे त्याला भारतात चित्रपट तयार करायचा आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिल्या आहेत.
- युथ डे स्पेशल; 'गॉडफादर' शिवाय 'स्टार' झालेले अभिनेते
ऑस्कर विजेत्या नोलानला भारतातील स्टार कलाकारांना घेऊन चित्रपट निर्मिती करायची आहे. त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. कदाचित तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे नोलानने त्याच्या द डार्क नाइट राइजेस' या चित्रपटातील काही दृश्ये ही जोधपूर मध्ये चित्रित केली होती. तेव्हा पासून त्याला भारतात नवा सिनेमा तयार करायचा आहे असे त्याचे म्हणणे आहे. सध्या भारतात अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपट तयार करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे.
- 'सैफच्या पोराची उडवली टर, मोक्कार हशा'
मागील वर्षी नोलानचा प्रसिद्ध आणि बहुचर्चित टीनेट हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील काही सीनचे शूटिंग हे मुंबईत झाले होते. त्यामुळे नोलानला भारतात सिनेमा बनवावा असे वाटले नसते तर नवल म्हणावे लागेल. याविषयी नोलान म्हणाला की, मी कधीही फार पुढचा विचार करत नाही. त्याचा परिणाम माझ्या सध्याच्या कामावर होतो. मात्र काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतो. पण मला भारतात एक अद्भुत अनुभव आला. त्यामुळे मला पुन्हा येथे येऊन एक प्रोजेक्ट करायचा आहे. त्यावेळी केलेला विचार प्रत्यक्षात आणायचा आहे. भारतीय अभिनेत्यांना सोबत घेऊन मला काम करायचे आहे. मात्र मला हे माहिती नाही की पूढे काय होईल तेव्हा जो विचार केला तो शेयर करत आहे.
- राजमाता जिजाऊ जयंती विशेष: ‘जिजाऊंच्या भूमिकेनं ‘स्ट्राँग’ बनवलं’
नोलानच्या टेनेट या चित्रपटात भारतीय अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनीही भूमिका केली आहे. त्यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी नोलान समवेत काम करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेयर केला होता. त्या म्हणाल्या की, नोलान सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली ही आनंददायी बाब म्हणावी लागेल. खूप चांगले व्यक्तिमत्व म्हणून मला त्यांच्याविषयी सांगावे लागेल. एवढ्या मोठया दिग्दर्शकाबरोबर काम करणे याचा कुठलेही दडपण मला जाणवले नाही. तो सगळा प्रवास आनंददायी म्हणावा लागेल.
यापूर्वी नोलान यांनी म्हटले होते की, मुंबई मध्ये येऊन तेथील निर्मात्याशी बोलणे, चित्रपटविषयक काही गोष्टींची चर्चाही केली त्यावेळी अनेक नवीन संकल्पना आपल्याला समजल्या. हे सगळे काही प्रेरणादायी होते. तेव्हापासून मला भारतात चित्रपट बनविण्याची तीव्र इच्छा झाली. नोलानचा जो टीनेट चित्रपट तयार केला गेला त्यात वॉर्नर ब्रदर्स ची निर्मिती आहे. त्यात रॉबर्ट पैटिनसन, जॉन डेविड वॉशिंगटन, एलिजाबेथ डेबिकी, केनेथ ब्रनाग, माइकल केन, आरोन टेलर-जॉनसन और क्लेमेंस पोइसी यांचाही सहभाग आहे. हा चित्रपट भारत, अमेरिका, ब्रिटेन, डेनमार्क, एस्टोनिया, इटली आणि नॉर्वे मध्ये चित्रित करण्यात आला आहे.
- मनोरंजन विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)