टॉलीवूडचे दिग्दर्शक हुशारच! बॉलीवूडचे मूर्ख नेहमीच... पियुष मिश्रांची सणसणीत प्रतिक्रिया |Bollywood vs South | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood vs South

Bollywood vs South: टॉलीवूडचे दिग्दर्शक हुशारच! बॉलीवूडचे मूर्ख नेहमीच... पियुष मिश्रांची सणसणीत प्रतिक्रिया

Piyush Mishra bollywood actor compare tollywood director talent: बॉलीवूडमध्ये कायमच आपल्या हटक्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक पियुष मिश्रांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आपण जे काही बोलू त्यावर ठाम राहू अशी भूमिका घेणाऱ्या पियुष यांचे एक वक्तव्य हे सध्या भलतेच चर्चेत आले आहे.

गँग्स ऑफ वासेपूर असेल किंवा गुलाल यासारख्या वेगवेगळ्या चित्रपट तसेच लिगल इलिगल नावाच्या वेब सीरिजमध्ये देखील पियुष मिश्रा यांच्यासारख्या अभिनेत्यानं प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवल्याचे दिसून आले आहे. काव्य, संगीत, संवादलेखन आणि पटकथाकार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांना बॉलीवूडमध्ये ओळखले जाते. तरुणाईमध्ये पियुष मिश्रा यांची मोठी क्रेझ आहे. त्यांच्या कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो.

आता पियुष मिश्रा यांनी बॉलीवूड आणि टॉलीवूड वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पियुष मिश्रा यांनी बॉलीवूडपेक्षा टॉलीवूडचे दिग्दर्शक हे जास्तच हुशार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनं त्यांना जास्त चर्चेत आणलं आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक हे गेल्या काही महिन्यांपासून प्रभावी कामगिरी करत असून त्यांनी लक्ष वेधून घेतल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रियाही गंभीरपणे घेतली जात आहे.

हेही वाचा: Deepika trolled fifa: मोठ्या तोऱ्यात गेली दीपिका ट्रोल झाली, नेटकऱ्यांनी झाडलं! 'तुला तर...'

मिश्रा यांचे ते वक्तव्य व्हायरल होताच बॉलीवूडच्या दिग्दर्शकांनी त्यांचा क्लास घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मिश्रा यांच्यावर टीका केली आहे. एका मुलाखतीमध्ये मिश्रा यांनी दिलेली प्रतिक्रिया ही भलतीच चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे वेगळ्याच वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून आले आहे. आपले मुर्ख असून तोचतोचपणा करुन एकाच विषयावर काम करतात. अशा शब्दां मिश्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.