Piyush Mishra Birthday: तर पीयूष मिश्रा 'मैंने प्यार किया' मध्ये सलमानच्या जागी दिसले असते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Piyush Mishra Birthday: तर पीयूष मिश्रा 'मैंने प्यार किया' मध्ये सलमानच्या जागी दिसले असते

Piyush Mishra Birthday: तर पीयूष मिश्रा 'मैंने प्यार किया' मध्ये सलमानच्या जागी दिसले असते

आज दिग्गज अभिनेते, उत्तम कवी, गायक पीयूष मिश्रा यांचा वाढदिवस. पीयूष मिश्रा यांनी लिहिलेली गाणी, कविता दर्दी प्रेक्षकांच्या आवडीचा विषय. पण सुरुवातीच्या काळात ज्या सिनेमातून सुपरस्टार सलमान खानने पदार्पण केलं अशा मैने प्यार किया या सुपरहिट सिनेमात पीयूष मिश्रा दिसणार होते. मग नेमकं काय झालं ?

हेही वाचा: Gandhi Godse: गांधी - गोडसेंना करावा लागणार पठाण शी सामना

पीयूष मिश्रा यांना सूरज बडजात्या यांनी एकदा कॉल केलेला. मैने प्यार किया साठी मुख्य हिरोची निवड करायची होती. सिनेमातील हिरोईन म्हणून भाग्यश्रीचं नाव निश्चित झालं होतं. परंतु अभिनेता अजून ठरत नव्हता.

हेही वाचा: Suniel Shetty : 'तुमचे कचऱ्यातले चित्रपट पाहायला लोकं पैसे का देतील!' बॉलीवूडचा अण्णा संतापला

पीयूष मिश्रा तारुण्यात एकदम हँडसम दिसायचे. बडजात्यांना पीयूष मिश्रा यांना हिरो म्हणून लाँच करायचं होतं. सूरज बडजात्या यांनी फोन केला परंतु काही कारणास्तव पीयूष मिश्रा त्यांना भेटायला गेले नाहीत. ही मोठी ऑफर त्यावेळी मिश्रा यांनी का नाकारली याचं कारण त्या माहीत नाही.

मैने प्यार किया पुढे सलमान खानने केला आणि सिनेमा सुपरहिट ठरला. आज पीयूष मिश्रांना हा रोमँटिक सिनेमा नाही करता आला याची काही खंत वाटतं नाही.

टॅग्स :Bollywood Newssalman khan