esakal | पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमारला दिला धीर!
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi and Akshay Kumar

पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमारला दिला धीर!

sakal_logo
By
सुधीर काकडे

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला मातृ शोक झाला. अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आईला आयसीयूमध्ये हलवल्याचं कळताच अक्षय युकेहून तातडीने मुंबईला परतला. या घटनेनंतर अक्षय कुमार मोठ्या दु:खात आहे. अक्षय कुमारच्या याच दु:खात सहभागी होत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला पत्र लिहीलं आहे.

पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमारला लिहीलेल्या या पत्रात त्यांनी अक्षयला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या प्रिय अक्षय, जर मला हे पत्र लिहावे लागले नसते, तर किती चांगले झाले असते. आई अरुणा भाटीया यांच्या निधनाची बातमी ऐकुन खूप दुख झालं. सकाळी जेव्हा सकाळी मी आपल्याला बोललो आपण फार दु:खी असल्याचे कळले. आपण लिहीलं होतं की, आई तुमच्यासाठी सर्वस्व होती असं तु लिहीलं होतं असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी अक्षयच्या दु:खात सहभागी होत सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. अक्षयने आपल्या इंस्टाग्रामवरुन हे पत्र शेअर केलं आहे.

हेही वाचा: Viral Video: कियारा की ती चिमुरडी, तुम्हीच सांगा बेस्ट कोण?

दरम्यान, अक्षय कुमारने स्वतः सोशल मिडियावर आईच्या निधनाची बातमी दिली होती. यात तो म्हणाला होता, 'ती माझा कणा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती दुसऱ्या जगात म्हणजेच माझ्या वडिलांकडे गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा आदर करतो. ओम शांती.'

loading image
go to top