coronavirus वर आधारित मालिनी अवस्थीच्या गाण्याचं पंतप्रधान नरेंद मोदींनी केलं कौतुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

रविवारी जनता कर्फ्यूचं समर्थन करण्यासाठी रस्ते ओस पडलेले तर दुसरीकडे मात्र लोक सोशल मिडीयावर टाईमपास करण्याचे वेगवेगळे पर्याय शोधताना दिसून आले..यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात व्यस्त होते.

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाची चिंता वाढताना पाहायला मिळतेय...आजच्या घडीला कोरोनाचा वाढता आकडा काळजी करण्यासारखा आहे..कालपर्यंत महाराष्ट्रात ७४ वर असणारा कोरोना बाधितांचा आकडा आता ८९ वर गेल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे...याच आधारावर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी रविवारी संपूर्ण दिवस जनता कर्फ्यु घोषित केला होता..मात्र असं असतानाही १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या आहेत.

रविवारी जनता कर्फ्यूचं समर्थन करण्यासाठी रस्ते ओस पडलेले तर दुसरीकडे मात्र लोक सोशल मिडीयावर टाईमपास करण्याचे वेगवेगळे पर्याय शोधताना दिसून आले..यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात व्यस्त होते..त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये लोक गायिका मालीनी अवस्थीच्या कामाचं कौतुक केलंय..

मालिनी अवस्थीने कोरोना व्हायरसची थीम लक्षात घेता यावर एक सुंदर गाणं बनवून देशातील जनतेासाठी एक उल्लेखनीय कार्य केलंय..

हे ही वाचा: परिस्थितीचं गांभीर्य ओळखा! मुंबईत १४ तर पुण्यात १ कोरोनाबाधित रुग्ण

कोरोना व्हायरस थीमवर आधारित असलेल्या मालिनी अवस्थीचं हे गाणं शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलंय की, 'जनता कर्फ्युमुळे सगळेजण आपापल्यापरिने यात योगदान देण्यासाठी मेहनत घेत आहेत. लोक गायिका मालिनी अवस्थीजी आपल्या अंदाजात लोकांना प्रेरित करत आहेत.'

मालिनी अवस्थी या अशा गायिका आहेत ज्यांनी अवधी, बुंदेलखंडी आणि भोजपूरी सारख्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत..हिंदीमध्ये देखील त्या सुंदर सुशील या गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत..हे गाणं २०१५ मधील दम लगाके हईशा या सिनेमातील आहे..

मालिनी व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक लोकगायक प्रीतम भारतवान यांचं देखील कौतुक केलंय,,प्रीतम यांनी सोशल डिस्टन्सिंगवर एक गाणं तयार केलंय..प्रीतम यांची पोस्ट शेअर करत मोदी यांनी लिहिलंय, 'जनता कर्फ्युवर आधारित लोक गायक प्रीतम भरतवाणजी यांनी एक अनोखा आणि खुपंच सुरेल असा संदेश दिला आहे'

रविवारी जनता कर्फ्यु असूनही १५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह केसेस आढळून आल्या आहेत..या १५ केसेसपैकी १४ पॉझिटीव्ह केसेस या मुंबईतील असल्याने मुंबईकरांसाठी ही सध्या चिंतेची बाब बनली आहे...

  pm narendra modi praises malini awasthi song based on coronavirus  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi praises malini awasthi song based on coronavirus