वयाच्या 42व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं गुपचुप उरकलं दुसरं लग्न

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री पूजा बत्राच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या काही काळापासून मीडियापासून दूर असेलेली ही अभिनेत्री वयाच्या 42व्या पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पूजा बत्राचं नाव एकेकाळी अक्षय कुमारसोबतही जोडले गेले होते.

मुंबई : एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री पूजा बत्राच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या काही काळापासून मीडियापासून दूर असेलेली ही अभिनेत्री वयाच्या 42व्या पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पूजा बत्राचं नाव एकेकाळी अक्षय कुमारसोबतही जोडले गेले होते.

मागच्या काही काळापासून तिच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. पण ती अशी अचानक लग्न करेल याची कोणालाही कल्पना नव्हती. पूजानं ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता असून त्यानं अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये दिसला आहे.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sea Sun Sand and a scorpion

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

अभिनेत्री पूजा बत्रानं 2002 मध्ये सर्जन डॉक्टर सोनू अहलूवालियाशी लग्न केलं होतं. त्यानंतर ती अमेरिकेला स्थायिक झाली होती. मात्र त्यांचं हे लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही. लग्नाच्या जवळपास 9 वर्षांनंतर सोनू आणि पूजा वेगळे झाले. घटस्फोट झाल्यानंतर बऱ्याच काळानं पूजाची ओळख बॉलिवूड अभिनेता नवाब शाहसोबत झाली आणि त्यांची मैत्री नंतर प्रेमात बदलली. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर केले होते. जेव्हा पासून त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे तेव्हा पासून या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Batra secretly marries boyfriend Nawab Shah, shares adorable photos