esakal | कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून पूजा भट्टचा सरकारवर राग अनावर

बोलून बातमी शोधा

Pooja bhatt

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून पूजा भट्टचा सरकारवर राग अनावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रूग्णांना औषधं, रेमडेसिवीर इन्जेक्शन, ऑक्सिजन बेड मिळत नाहियेत. या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकार सक्षम नाही असं मत अभिनेत्री पूजा भट्टने सोशल मीडियावर मांडलं.

पूजा ट्विट करत म्हणाली, ‘कोणाला जिवंत राहिलो म्हणून अपराधीपणा वाटत आहे का? कारण मला वाटत आहे. जेव्हा कोणाचाही मृत्यू होतो, तेव्हा मला धक्का बसतो. सगळी व्यवस्था अयशस्वी ठरत आहे. राजकीय वर्गाचे हात रक्ताने माखलेले आहेत. कारण, त्यांनी आधीपासून तयारी केली नाही. सगळं ठीक आहे असा संदेश ते सारखा देत होते, कारण त्यांनी सगळं आपल्यावर सोडलं आहे.’ पूजाच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : 'कशाची शिक्षा भोगतोय आपण?'; नाशिक दुर्घटनेवर दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप

पूजाच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास तिची 'बॉम्बे बेगम' ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमधील दृश्यांवरून वादही निर्माण झाला होता. यामध्ये पूजाने व्यावसायिकेची भूमिका साकारली होती.