पूजा हेगडेनं मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट

स्वाती वेमूल
Friday, 19 February 2021

बॉलिवूडमध्ये यश मिळालं नसलं तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पूजाने स्वत:ची वेगळी छाप सोडली. 

बॉलिवूडनंतर टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री पूजा हेगडे हिने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलंय. गेल्या काही महिन्यांमध्ये पूजाचे दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिची ओळख होत असतानाच तिला बॉलिवूडमधलेही प्रोजेक्ट्स मिळत आहेत. याच यशाच्या आधारे तिने आता मुंबईत हक्काचं घर खरेदी केलंय. 

समुद्रकिनाऱ्याजवळच पूजाने ३ बीएचके फ्लॅट घेतला आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून जमेल तेव्हा ती फ्लॅटच्या इंटेरिअरसाठी काम करतेय. पूजाचं हे घर मुंबईतील तिच्या आईवडिलांच्या घरापासून जवळच असल्याचं म्हटलं जातंय. आतापर्यंत पूजा त्यांच्यासोबतच राहत होती. मात्र आता तिने स्वत:साठी वेगळा फ्लॅट घेतला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

हेही वाचा : शशांक केतकरच्या बहिणीचं मालिकेत पदार्पण; चाहत्यांमध्ये उत्सुकता

हेही वाचा : ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये हा अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज 
 

सध्या तिचा 'राधेश्याम' हा चित्रपट चर्चेत आहे. यामध्ये ती 'बाहुबली' फेम प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याचसोबत ती सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात झळकणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' आणि अखिल अक्किनेनीसोबत 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' हे चित्रपटसुद्धा तिच्या हातात आहेत. पूजाने 'मोहेंजोदारो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हृतिक रोशनसोबतच्या या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नशीब आजवमावण्याचा प्रयत्न केला आणि तिथे तिला तुफान यश मिळतंय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Hegde buys a luxurious flat in Mumbai