पूजाच्या आयुष्यातील पहिला 'एफबी लाईव्ह' 'ई सकाळ'वर

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
मंगळवार, 11 जुलै 2017

मंगळवारी दुपारची वेळ नेटकऱ्यांसाठी पर्वणी ठरली. कारण दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांची आवडती अभिनेत्री पूजा सावंत ई सकाळच्या व्यासपिठावर लाइव्ह आली होती. विशेष बाब अशी की पूजा पहिल्यांदाच अशा प्रकारच्या लाइव्ह अॅक्टिव्हिटीला सामोरी जात होती. या शोला हजारो प्रेक्षकांनी लाइव्ह दाद दिली. 

पुणे :  मंगळवारी दुपारची वेळ नेटकऱ्यांसाठी पर्वणी ठरली. कारण दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांची आवडती अभिनेत्री पूजा सावंत ई सकाळच्या व्यासपिठावर लाइव्ह आली होती. विशेष बाब अशी की पूजा पहिल्यांदाच अशा प्रकारच्या लाइव्ह अॅक्टिव्हिटीला सामोरी जात होती. या शोला हजारो प्रेक्षकांनी लाइव्ह दाद दिली. 

आगामी लपाछपी या चित्रपटाच्या निमित्ताने हा टाॅक शो झाला. पण त्या निमित्ताने पूजाने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना बिनधास्त उत्तरं दिली. अगदी तिला कोणत्या को स्टारसोबत काम करायला आवडतं इथपासून तू लग्न कधी करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देताना पूजाने अंकुश चौधरीसोबत काम करायला आवडत असल्याचे सांगितलं, तर लग्नाचा अद्याप विचार केला नसल्याचंही बोलून दाखवलं. 

लपाछपीचा एकूण अनुभव.. आगामी सिनेमे.. भटक्या प्राण्यांसाठी ती करत असलेलं काम.. हेल्थ टिप्स अशा अनेक गोष्टी तिने या लाइव्ह टाॅक शो मध्ये बोलून दाखवल्या. आॅनलाइन विश्वातही या टाॅक शोला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 40 मिनिटं सुरू असलेल्या या शोला 17 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइव्ह प्रतिसाद दिला. रसिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ई सकाळने सुरु केलेला हा लाइव्ह उपक्रम रसिकांना कमालीचा आवडत असल्याचेच यातून दिसलं. 

पूजा सावंत लाईव्ह.. 

या शोच्या शेवटी लपाछपी चित्रपटाच्या निर्मात्या अरूणा भट याही या कार्यक्रमात सामील झाल्या. विशेष बाब अशी ई सकाळने सुरू केलेल्या लाइव्ह रिव्ह्यू या संकल्पनेला पूजा सावंतसह भट यांनी पाठिंबा दिला. शुक्रवारी या सिनेमाचा लाइव्ह रिव्ह्यू होणार आहे. त्यावेळी आपण आवर्जून उपस्थित राहू असं आश्वासन पूजाने यावेळी दिलं. 

Web Title: pooja sawant live show esakal news