Poonam Pandey Memes : 'कैसा लगा मेरा मजाक'! आता नेटकऱ्यांनी पूनमवर मीम्समधून केली आगपाखड

पूनमनं जो व्हिडिओ व्हायरल केला त्यातून नेटकऱ्यांनी तिच्याविषयी ज्या शंका व्यक्त केल्या होत्या त्या खऱ्या ठरल्या आहेत. (Poonam Pandey Viral Memes)
Poonam Pandey Viral Memes
Poonam Pandey Viral Memesesakal

Poonam Pandey Viral Memes : कुणी काहीही म्हटलं तरी सोशल मीडियावर पूनम पांडेच्याबाबत व्हायरल झालेल्या निधनाच्या बातमीवरुन उलट सुलट प्रतिक्रिया सुरु होत्या. अखेर त्यावर आता पूनम पांडेनं स्वत: एक व्हिडिओ शेयर करुन सर्वांनाच धक्का दिला आहे. काल दिवसभर पूनम पांडेचं गर्भाशयाच्या कॅन्सरनं निधन झाल्याच्या बातम्यांना उधाण आले होते.

पूनम नेहमीच तिच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. आपण काहीही बोललो तरी लोकप्रिय होतो, आपल्या वक्तव्याची, व्हिडिओची दखल घेतली जाते हे माहिती असणाऱ्या पूनमचा आता जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

माझे निधन झालेले नाही. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबत जनजागृती करण्यासाठी आपल्याला हे नाटक करावे लागले. झालेल्या प्रकारासाठी मी माफी मागते असे पूनमनं म्हटले आहे. मात्र नेटकऱ्यांनी पूनमला धारेवर धरले आहे. तू तुझ्या निधनाची बातमी शेयर करुन एखाद्या उपक्रमाची जाहिरात करते हे कितपत योग्य आहे, आणखी वेगळ्या प्रकारे ते प्रमोशन करता आले नसते का, असे प्रश्न नेटकऱ्यांनी पूनमला विचारले आहेत.

सोशल मीडियावर कालपासून पूनम ही ट्रेंडिंगचा विषय आहे. त्यात तिचा मृत्यू कशामुळे झाला त्या कॅन्सरविषयी नेटकऱ्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात कित्येकांना तिच्या अतरंगी वागण्याबद्दल संशय होताच हे आताच्या मीम्समधून दिसून येत आहे.

बॉलीवूड, साऊथच्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या त्या क्लिप्समधून पूनमवर निशाणा साधला जात आहे. त्यात प्रसिद्धीसाठी पूनम काय करु शकते पुन्हा एकदा दिसून आले आहे, तिनेच हे दाखवून दिले आहे अशा आशयाचे मीम्स आणि प्रतिक्रिया दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com