Video :करण आणि पुनम पांडेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,’घरी बायको...’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video
Poonam Pandey
karanvir Bohra

Video :करण आणि पुनम पांडेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,'घरी बायको...'

छोट्यापडद्यावरिल प्रसिद्ध चेहरा म्हणून करणवीर बोहरा ओळखला जातो. अनेक मालिकांनमध्ये उत्कृष्ट अभिनयाने छाप सोडली आहे. पूनम नेहमीच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते करण आणि बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हि दोघं लॉकअप शोमध्ये एकत्र दिसले होते.  

सोमवारी मध्यरात्री ह्यांच्या जोडीला पापाराझींनी एअरपोर्टवर गाठलं.यावेळी दोघांनी एकत्र पोझ दिल्या आणि पापाराझींनीसोबत गप्पा मारल्या. पोझ देतांना अचानक पूनमला उचलतो आणि गरगर फिरवतो. दोघेही हसतात मात्र हे करण पूनमला आवडलेलं दिसत नाही. यात करण पूनम पांडे पंखासारखी हलकी असल्याच म्हणतो. पूनम या वागण्याने हैराण झालेली दिसते आणि खूप हसत आहे. मात्र तिला यावेळी अस्वस्थ अवस्थेत तिचे कपडे ठिक करतांना दिसली.यावेळी तिने स्किनी ब्लैक पैंट आणि प्रिंटेड टी शर्ट घातला होता.  

हेही वाचा: Urfi Video: उर्फी झोपाळ्यावरुन पडली अन् गर्दी जमली...

हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी करणला चांगलच धारेवर धरलं आहे.यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट केलीय की करणला जरा जास्तच चढली आहे तर एकाने करणला घरी गेल्यावर त्यांची बायको चांगलीच धडा शिकवेल असं म्हटलंय. एकानं लिहिलंय की कॅमेरा दिसताच 5 रुपयेवाली अ‍ॅक्टिंग केलीय. करण यामुळे चांगलाच ट्रोल होत आहे.