Poonam Pandey Death Kangana Ranaut Actress reaction
Poonam Pandey Death Kangana Ranaut Actress reactionesakal

Kangana Reaction Poonam Pandey Death: 'एका तरुण मुलीला कॅन्सर होणं अन्...' पूनम पांडेच्या निधनावर कंगनाची मोठी प्रतिक्रिया!

पूनमच्या निधनानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण (Poonam Pandey Latest Marathi News) आले आहे.

Poonam Pandey Death Kangana Ranaut reaction : टीव्ही मनोरंजन विश्व आणि बॉलीवूडमध्ये नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी सेलिब्रेटी अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनानं बॉलीवूडला मोठा (Poonam Pandey Death) धक्का बसल्याचे दिसून आले. गर्भाशयाच्या आजारानं पूनमनं अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

पूनमच्या निधनानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण (Poonam Pandey Latest Marathi News) आले आहे. या सगळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगनानं पूनमच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कंगनाची ती प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. यापूर्वी काही मोजक्याच बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी पूनमच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पूनमनं अचानक घेतलेली एक्झिट ही तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.

सोशल मीडियावर पूनमच्या निधनावर वेगवेगळे तर्क सुरु झाले आहेत. (Kangana Ranaut Reaction On Poonam Death) आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला, तीन दिवसांपूर्वी तर तिच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ती फिरताना दिसत होती. अचानक तिच्या तब्येतीत काय बिघाड झाला, तिच्या कुटूंबियांनी देखील जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही, अशा वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

Poonam Pandey Death Kangana Ranaut Actress reaction
Poonam Pandey Death Kangana Ranaut Actress reactionesakal

यात कंगनाच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पूनमनं कंगनाच्या लॉक अप नावाच्या रियॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. त्या शो मध्ये पूनमनं अनेक वेगवेगळे खुलासे केले होते. कंगनानं तिच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, पूनमच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. त्या बातमीनं धक्का बसला. एका तरुण मुलीला कॅन्सर होण आणि त्यात तिचा मृत्यू होणं हे खूप धक्कादायक आहे. ओम शांती...अशा शब्दांत कंगनानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Poonam Pandey Death Kangana Ranaut Actress reaction
Poonam Pandey चं निधन झालं तो, Cervical Cancer नेमका काय असतो?

या शिवाय अभिनेत्री संभावना सेठनं देखील पूनमच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या निधनाचे वृत्त ऐकून खूपच धक्का बसला. मी तिला ओळखत होते. आम्ही खतरो के खिलाडीमध्ये एकत्र काम केले होते. आम्ही काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com