esakal | रसिका सुनीलच्या लग्नाची घोषणा; 'या' व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ
sakal

बोलून बातमी शोधा

रसिका सुनीलच्या लग्नाची घोषणा; 'या' व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ | Rasika Sunil

रसिका सुनीलच्या लग्नाची घोषणा; 'या' व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ | Rasika Sunil

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील Rasika Sunil लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रसिकाने सोशल मीडियावर प्रियकर आदित्य बिलागीसोबतचा Aditya Bilagi फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. आदित्यनेही रसिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. गेल्या वर्षापासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. जानेवारी २०२१ मध्ये रसिकाने आदित्यला डेट करत असल्याचं जाहीर केलं होतं. (Rasika Sunil Wedding)

'जब वी मेट' या चित्रपटातील एक डायलॉग लिहित आदित्यने रसिकाशी लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. 'जेव्हा रसिकाने माझी आणि रशची पहिली भेट घडवून आणली होती, तेव्हा तो म्हणाला, "माझ्या वयात एका नजरेत कळून जातं की मुला-मुलीत काय चालू आहे", त्यामुळे रशने जे भाकित वर्तवलं ते आम्ही तुमच्यासोबत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. रसिका, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. आपलं नातं अधिकृत करण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही', अशा शब्दांत आदित्यने भावना व्यक्त केल्या आहेत. रश हा रसिकाचा पाळीव श्वान आहे. #RaskyWedsAdi असा हॅशटॅगसुद्धा त्याने या पोस्टमध्ये दिला आहे.

हेही वाचा: BBM 3: 'हाच विजेता ठरणार'; प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असलेला हा स्पर्धक कोण?

दोन वर्षांपूर्वी रसिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथे तिची आदित्यशी ओळख झाली. १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच रसिकाने तिचं रिलेशनशिप जाहीर केलं होतं. ‘सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन देत तिने आदित्यसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला होता.

loading image
go to top