esakal | लोकाग्रहास्तव पुन्हा भेटीला येतेय ‘जिवलगा’ मालिका

बोलून बातमी शोधा

Jeevlaga
लोकाग्रहास्तव पुन्हा भेटीला येतेय ‘जिवलगा’ मालिका
sakal_logo
By
टीम ई सकाळ

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. २ मे पासून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येईल. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दमदार अभिनयाने नटलेली ही मालिका पुन्हा पाहता यावी अशी मागणी प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते. नुकतीच या मालिकेने दोन वर्ष देखिल पूर्ण केली. यानिमित्ताने मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता.

मालिकेतील कलाकारांच्या या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालाच शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पहायला मिळावी अश्या कमेंट्सही येत होत्या. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हेही वाचा : "मला बुधवार पेठेत कधी पाहिलं"; शिवीगाळ करणाऱ्याचा मानसी नाईकने घेतला समाचार

'जिवलगा' मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच 'जिवलगा' मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. मालिकेतील तगडी स्टारकास्ट ही त्याची जमेची बाजू ठरली. स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. तर सिद्धार्थ आणि मधुरा या नवीन जोडीनेदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.