esakal | कॅन्सरशी झुंज अपयशी, मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

madhav moghe

कॅन्सरशी झुंज अपयशी, मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे निधन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे (madhav moghe) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कॅन्सरसारख्या दुर्धर (cancer) आजाराशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांच्या जाण्यानं हिंदी आणि मराठी मालिका, चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मराठीतील अनेक सेलिब्रेटी कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.(Popular mimicry artist madhav moghe passes away after a battle with cancer)

शोले (sholy) या चित्रपटातील ठाकूरची मिमिक्री (thakur mimicry) करुन त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती संजीव कुमार यांची मिमिक्री केल्यामुळे. याशिवाय त्यांनी दामिनी आणि घातक सारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिमिक्रीसाठी मोघे प्रख्यात होते. याबरोबरच वेगवेगळ्या कॉमेडी शो मध्येही त्यांचा सहभाग होता. त्या मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या पत्नीचे 21 जुन 2021 रोजी निधन झाल्यावर माधव यांनी अन्न - पाणी सोडले होते. त्यामुळे ते अशक्त झाले होते. त्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सगळ्या चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी माधव यांना शेवटच्या स्टेजचा फुफुसांचा कर्करोग असल्याचे निदान केले. अशी माहिती त्यांची मुलगी प्राची मोघे यांनी दिली.

एमटीव्हीवर फुली फालतू नावाचा जो शो होता त्यात मोघे यांनी शोले या चित्रपटातील ठाकूरची मिमिक्री केली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी 1993 मध्ये आलेल्या दामिनी मालिकेतून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यात सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ यशस्वी झाला होता.

हेही वाचा: #BoycottToofaan:फरहानचा 'तुफान' वादाच्या भोवऱ्यात

हेही वाचा: 6 years for Baahubali: 'या' कारणांमुळे सुपरहिट ठरला 'बाहुबली'

जाना पहचाना हा मोघे यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यात सचिन पिळगावकर, रणजीत कौर यांची प्रमुख भूमिका होती. त्यांना बॉलीवूड आणि मराठीतील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.

loading image