प्रसिध्द अभिनेता पीसी जॉर्ज यांचे निधन

त्यांना उपचारासाठी त्रिशुर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
actor pc george
actor pc georgeTeam esakal

मुंबई - पोलिस अधिका-याच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवणा-या पीसी जॉर्ज (Actor PC George ) यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या दरम्यान त्यांचे निधन झाले. ते पूर्वाश्रमीचे पोलिस अधिकारी होते. त्यानंतर अभिनयाची आवड़ जोपासत त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. तिथे त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यांच्या जाण्यानं मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Popular Police Officer Who Turned Actor PC George Passes Away)

पीसी जॉर्ज हे 73 वर्षांचे होते. त्यांना उपचारासाठी त्रिशुर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांना सोशल मीडियावर मल्याळम चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला आहे.

actor pc george
नाट्य, चित्रपटसृष्टीतील अनेक कामगारांची मदतीसाठी आर्त हाक
actor pc george
'शो मस्ट गो ऑन'; पायाला गंभीर दुखापत असतानाही संकर्षणने पूर्ण केलं नाटक

वेगवेगळया चित्रपटांमध्ये पीसी जॉर्ज यांनी व्हिलन्सची भूमिका पार पाडली होती. त्यासाठी ते प्रसिध्दही होते. त्यांनी 80 च्या दशकात आपल्या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. 1988 मध्ये प्रसिध्द अभिनेता मामुटी अभिनित संघम या चित्रपटात त्यांनी केलेल्या अभिनयामुळे त्यांच्या करिअरचा ग्राफ उंचावत गेला होता. त्यांनी 70 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यापैकी अयिरापारा, इन्नाले, चाणाक्यन, अथर्वम सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com